असा आहे इंग्लंडच्या राणीच्या मृत्युनंतरचा प्लॅन : पाहा सिक्रेट कोड काय आहे..

येत्या २१ एप्रिलला इंग्लंडच्या महाराणी एलीझाबेथ द्वितीय वयाच्या ९१व्या वर्षात पदार्पण करत आहेत. पण सत्ता-संपत्तीची कितीही संपन्नता असली तरी मृत्यू कोणालाच चुकलेला नाही. त्यामुळे महाराणी एलीझाबेथ यांच्या निधनानंतर ही दु:खद बातमी जगाला कशाप्रकारे सांगायची, याचं पूर्वनियोजन आधीच केलं गेलंय. कारण ज्या राजघराण्याच्या त्या सम्राज्ञी आहेत, त्या राजघराण्याने जवळ जवळ अख्ख्या जगावर राज्य केलंय.

        महाराणींचा मृत्यू झाल्याची बातमी सांगण्यासाठी "लंडन ब्रिज इज डाऊन" हा कोडवर्ड ठरवण्यात आलाय. महाराणींच्या मृत्यूची अधिकृत घोषणा त्यांचे सचिव सर ख्रिस्तोफर गेइडट करणार आहेत. ते ही बातमी सर्वप्रथम ब्रिटनच्या पंतप्रधानांना देतील. आणि त्यानंतर सुरू होईल मिशन लंडन ब्रिज. ज्याद्वारे ही दुःखद बातमी जगाला कळवली जाईल.

युके सोडून जगात कॅनडा, अॉस्ट्रेलीया, बहामास असे १५  देश आहेत की त्यांच्या प्रमुख अजून महाराणी एलिझाबेथच आहेत.  पंतप्रधानानंतर युकेच्या फॉरेन अॉफीसकडून ही वार्ता त्या १५ राष्ट्रांना कळवली जाईल.  यानंतर राष्ट्रकुलातील ३२ देशांना ही माहीती दिली जाईल. ज्यात भारताचा समावेश होतो.

महाराणी एलीझाबेथ द्वितीय या तब्बल ६ दशकांहून अधिक काळ राजगादीवर विराजमान आहेत (स्त्रोत

 

पॅलेसच्या वेबसाईटवर थोडक्या शब्दात निधनाची बातमी देणारा मजकूर झळकेल, बीबीसीकडून आपले सर्व मनोरंजक कार्यक्रम बंद करण्यात येतील. रेडीओ चॅनेल्सच्या निवेदकांना याचा संकेत देण्यासाठी विशेष लाईट्सची व्यवस्था करण्यात आली आहे, जे महाराणींच्या मृत्युनंतर फ्लॅश होऊन कार्यक्रम थांबवण्याचा इशारा देतील, दुःखद वातावरणाला साजेसं असं संगीत वाजवण्यात येईल, टीव्ही चॅनेल्सचे वृत्तनिवेदकही काळे कोट परिधान करतील. हा दु:खवटा ग्रेट ब्रिटन मध्ये १२ दिवस पाळण्यात येईल. १२ दिवसानंतर महाराणींचं पार्थिव दफन करण्यात येईल. आणि इंग्लंडच्या गादीवर प्रिन्स चार्ल्स आणि त्यांची पत्नी कॅमिला विराजमान होतील. 

इतकं मोठं पध्दतशीर नियोजन असलं तरी सोशल मिडीयामुळे ही बातमी चुटकीसरशी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल. पण त्यांच्या राणीवर त्या लोकांचं एवढं प्रेमच आहे म्हटल्यावर चालायचंच... 

 

 

 

सबस्क्राईब करा

* indicates required