computer

ही श्वेता कोण आहे आणि तिच्या नावाने मिम्स का व्हायरल होत आहेत?

गेल्या काही तासंपासून इंटरनेटवर श्वेताचे मीम धुमाकूळ घालत आहेत. मीम बघून ज्यांना हे काय प्रकरण माहित त्यांना हसू आवरत नाहीये, तर ज्यांना यातले काही माहीत नाही त्यांच्या मात्र डोक्यात काहीच शिरत नाहीये. तर आता आम्ही तुम्हाला हे पूर्ण प्रकरण काय आहे हे सांगणार आहोत. 

एक कॉलेज झूम कॉल सुरू होता, त्यात थोडेथोडके नाहीतर तर तब्बल १११ जण एकत्र होते. सर्व काही ठीक सुरू असताना अचानक एका श्वेता नावाच्या मुलीचा तिच्या एका मैत्रिणीसोबत फोन कॉल सुरू होतो.

योगायोगाने ती बिचारी श्वेता आवाज म्युट करायला विसरलेली असते. तिचा हा फोन कॉल झूम कॉलवर असणारे सर्व १११ जण ऐकत असतात, ती फोनवर काय बोलत असते? तर, तिला तिच्या मित्राने आपल्या खाजगी आयुष्याबद्दल सांगितलेल्या गोष्टी ती मैत्रिणीला सांगत असते. तेच ते गॉसिपी.

हे सुरु असताना तिचे मित्र तिला ओरडून ओरडून माईक सुरू असल्याचे सांगत असतात, पण श्वेताचे लक्ष त्याकडे नसतेच. ही सर्व रेकॉर्डिंग इंटरनेटवर व्हायरल झाल्याने सर्वाना हसू आवरत नाहीये.  

त्यात ती म्हणते की हे त्याने त्याच्या बेस्टफ्रेंडलाही सांगितलेलं नाही, तेवढ्यात झूम कॉल मधील एकजण म्हणतो की, आता ही गोष्ट १११ जणांना माहीत झाली आहे. यानंतर मात्र मिम्सचा पाऊस सुरू झाला. पुढील दोन तीन दिवस तरी श्वेता मिम्स वायरल होतील असे वातावरण आहे. 

फोन कॉलच्या शेवटी ती म्हणते तो पंडित आहे. आता ही श्वेता आणि हा पंडित कोण हे गुलदस्त्यात असले तरी देशभर मात्र सगळे वातावरण या श्वेताभोवती गोळा झाले आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required