अबब चक्क कागदाने बनवलं घड्याळ...!!

मंडळी कागदावर काढलेले 3D पेंटिंग तुम्ही अनेकदा बघितलं असेल पण कागदाने तयार केलेलं 3D डिझाईन क्वचितच बघितलं असणार. जपान मधल्या ‘मनाबू कोसाका’ नामक एका कलाकाराने चक्क कागदाने हुबेहूब मनगटी घड्याळ तयार केलंय राव.

स्रोत

रोलेक्स, कॅसीओ सारख्या प्रसिद्ध घड्याळांच त्याने हुबेहूब मॉडेल तयार केलंय. चित्रात तुम्ही हे बघूच शकता. घड्याळातील लहानसहान बारकावे देखील त्याने टिपले आहेत. ही कमाल झाली आहे ‘केंट पेपर’ या कागदाच्या काहीश्या वेगळ्या प्रकारापासून. केंट पेपर हा रासायनिक प्रक्रियेतून तयार केलेला कागद असतो. या कागदाच्या वेगळ्या बनावटीमुळे त्याला वाटेल तसा आकार देता येतो.

स्रोत

या कामात मनाबू कोसका 3D प्रिंटरचा वापर करत नाही. तो स्वतः हाताने घड्याळांना आकार देतो. त्याने टिपलेले बारकावे बघता खऱ्या आणि खोट्या घड्याळात फरक करणं कठीण होऊन बसतं राव. मनाबू १५ वर्षापासून केंट पेपर पासून अशाच 3D गोष्टींना आकार देत आहे. यातील सर्वात अवघड काम म्हणजे बारकावे टिपणे. यात तो अनेकदा अपयशी झाला पण त्याने सातत्य सोडलेलं नाही. या सगळ्यात त्याने बनवलेले ‘स्पीडमास्टर’ घड्याळ हे सर्वात जास्त प्रसिद्ध झाले आहे.

स्रोत

या कालाकृत्या आपण मनाबू कोसकाच्या ट्विटर आणि इंस्टाग्राम वर पाहू शकतो.

 

सबस्क्राईब करा

* indicates required