अमिताभ तात्यांच्या या सिनेमाचा हा ट्रेलर १ मिनिटापेक्षा झेलून दाखवाच!!

Subscribe to Bobhata

मंडळी, जमलेल्या तमाम जनतेसमोर एक ट्रेलर दाखवण्यात येणार हाय. तो तुम्ही शांत चित्ताने पाहावा अशी विनंती आम्ही....करणार नाही, कारण तुम्हाला ट्रेलर बघून राग येण्याची शक्यता हाये. अन म्हनूनच कोनीही आरडा ओरडा न करता ट्रेलर बघून घ्या, मग जे काही दंगे करायचे असतील ते करा. कोनाचा बा अडवनार नाय!!

ए पिंट्या खाली बस की...चिंगीला डोळे फाडून काय बघतो, बाप हाणेल तिचा. ओ मावशी बकऱ्या बाजूला ठेवा, इकडं लक्ष द्या. पाटीलसाहेब, गरिबाचे दोन शब्द ऐकून घ्या!!

हा तर, राव ट्रेलरला असं जनतेसमोर दाखवण्याचा मुद्दा असा की, यात आमचे आदरणीय, लाडके, हिरोंचे हिरो, श्री श्री ‘अमिताब तात्या’ उर्फ बिग बींनी काम केलंय!! तात्यांशिवाय जया आजीपन पिच्चरमधी हायत. म्हंजे दोघं जोडीनं हायत शिनिमात. आता तात्यांच्या कार्याबद्दल आम्ही काय बोलणार? तडफदार व्यक्तिमत्व आहे ते. त्यांचा एकपन पिच्चर चुकवला नाय आपन. पन आज त्यांनी जे केलंय त्याचा इचार कोनीच केला नसणार.

झालंय असं की, ‘दि ग्रेट लीडर’ नावाचा एक हिंदी कम भोजपुरी पिच्चर आलाय. हा पिच्चर आहे राजकारणावर. मंडळी, आधी भोजपुरीमध्ये बनलेला पिच्चर आता हिंदी मध्ये डब करून १५ डिसेंबरला रिलीज होनार हाय. याच शिनिमाचा ट्रेलर सध्या लोकांची झोप उडवत आहे.

ट्रेलर बघून तुम्हाला अनेक प्रश्न पडतील. अमिताभ तात्यांनी हा सिनेमा का केला? येवढं काय अडलं होतं त्यांचं? भोजपुरीमध्ये बनला तेवढा बास न्हवतं का? आता हिंदीत का? गुलशन ग्रोव्हरसारखा व्हिलन मनाचा माणूस सुद्धा काय करतोय इथं? मंडळी, सगळे प्रश्न बाजूला ठेवून आधी तुम्ही ट्रेलर बघा. मग सांगा तुम्हाला ट्रेलर १ मिण्टापेक्षा जास्त झेपला का!!

आता ट्रेलर बघून जेव्हडा काय आरडाओरडा करायचा असंल,  ते कमेंटबॉक्स मध्ये येऊन करा राव!!

सबस्क्राईब करा

* indicates required