संजय दत्त आतंकवादी नाही ? पाहा बरं 'संजू'च्या ट्रेलर मध्ये काय काय दडलंय ते !!
काही दिवसापूर्वी आलेल्या ‘संजू’च्या टीझरने उत्सुकता शिगेला पोहोचवली होती. त्या नंतर रोज एक पोस्टर रिलीज करून ही उत्सुकता आणखी वाढवण्यात आली. आणि आज शेवटी संजूचा ट्रेलर आलाय भाऊ. आजवर बॉलीवूड मध्ये बनलेल्या सर्व बायोपिक मध्ये संजू वेगळा ठरणार आहे असा विश्वास तुम्हाला ट्रेलर बघून वाटेल.

सोनम कपूर, परेश रावल, विकी कौशल आणि अनुष्का शर्मा यांचे लुक रिलीज केल्यानंतर चित्रपटातील पात्र कसे असतील याचा साधारण अंदाज आला होता. ट्रेलर वरून या गोष्टीत काय धम्माल असेल याची एक झलक मिळाली आहे.
ट्रेलरवरून तरी एक गोष्ट जाणवते ती म्हणजे सिनेमातून संजय दत्तच्या प्रतिमेला मोठं करण्याचा प्रयत्न केला गेलेला नाही. संजय दत्तने जे केलं ते सगळं मान्य करूनच कथा पुढे सरकते. अपवाद फक्त एका गोष्टीचा.
संजय दत्तच्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील सहभागामुळे त्याची प्रतिमा आतंकवादी अशी झाली होती. या एका गोष्टीला चित्रपटात अमान्य ठरवलंय. ‘I’m not a terrorist’ असा संवाद संजू म्हणजे रणबीर कपूरच्या तोंडी दिसतो.

संजय दत्तच्या ड्रग्सच्या सवयी पासून ते त्याच्या शेकडो (?) मुलींबरोबरच्या लफडी, त्याची जेल वारी, कोर्ट कचेऱ्या इत्यादी गोष्टी यात क्रमवार दिसतायत. संजूच्या पोस्टर मधून ज्या ५ लुक बद्दल माहिती मिळाली होती त्याचं कोडं ट्रेलर बघून सुटतं.
टीझरच्या वेळी म्हटल्या प्रमाणे रणबीरने त्याच्या करियरचा सर्वात चांगला अभिनय या चित्रपटात केला आहे. बाकीच्या पात्रांबद्दल बोलायचं झालं तर ट्रेलर मध्ये ‘सब कुछ संजू’ असा प्रकार असल्याने त्यांची केवळ काही सेकंदापुरती झलक दिसते.
एकंदरीत राजकुमार हिरानी यांनी पुन्हा एकदा संजूच्या कथेचं सोनं केलेलं आहे. आता तुम्ही सुद्धा ट्रेलर पाहून घ्या भाऊ....तुमचं मत सांगायला विसरू नका.
आणखी वाचा :
ब्लॅक फ्रायडे : १२ मार्च १९९३ रोजी नेमकं काय घडलं होतं ?...जाणून घ्या महत्वाचे ८ मुद्दे !!
ऑस्कर प्रिटोरियस, मेसी निघाले जेलमध्ये; जगातल्या या सेलेब्रिटींवरती चालले आहेत खटले...




