या अळ्या चक्क प्लास्टिक खातात ? वाचा या अनोख्या वैज्ञानिक शोधाबद्दल !!

मंडळी, नुकतीच प्लास्टिक बंदी झालेली आहे. प्लास्टिक कचरा हा संपूर्ण जगाला पडलेला प्रश्न आहे. पण त्याच बरोबर प्लास्टिकला पूर्णपणे पर्याय नाही हेही खरं. प्लास्टिकचा आज अनेक महत्वाच्या गोष्टींसाठी वापर होतो. मग अशावेळी ‘धरताही येईन आणि सोडताही’ येईना अशी परिस्थिती होते. यावर अनेक वर्षांपासून संशोधन चालू आहे. अनेक उपाय शोधून काढले गेले पण प्लास्टिकची समस्य आहे तशीच आहे.

स्रोत

आता एका नव्या भन्नाट कल्पनेने प्लास्टिकची समस्या सुटेल असं दिसतंय. हा उपाय म्हणजे प्लास्टिक खाणाऱ्या अळ्या. मंडळी विश्वास बसत नाही ना ? पण प्लास्टिक खाणाऱ्या अळ्या खरंच अस्तित्वात आहेत. चला तर तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो.

प्लास्टिक खाणाऱ्या अळ्यांचा शोध कसा लागला ?

स्रोत

अमेरिकेतली स्पॅनिश जीवशास्त्रज्ञ ‘फेडेरिका बटरेचिनी’ ही मधमाश्यांच्या पोळ्यातील मेण खाणाऱ्या अळ्यांवर संशोधन करत होती. एके दिवशी तिने या अळ्या एका प्लास्टिक पिशवीत ठेवल्या होत्या. ही पिशवी तशीच ठेवून ती निघून गेली आणि येऊन बघते तर काय. अळ्यांनी प्लास्टिकचा काही भाग खाऊन तिथून पलायन केलं होतं.

या अळ्यांनी अवघ्या ४० मिनिटात प्लास्टिक कुरतडलं होतं. ही गोष्ट लक्षात येताच फेडेरिका आणि तिच्या टीमने या अळ्यांवर परीक्षण करण्यास सुरुवात केली. या कामात इतर काही संस्थांनी देखील भाग घेतला.

स्रोत

फेडेरिका ने पुढे दिलेल्या माहितीनुसार मेण खाणाऱ्या अळ्यांच्या आत मेण पचवण्याची जी ताकद असते तीच प्लास्टिकचं विघटन करण्यात मदत करते. मेण आणि प्लास्टिक या दोन्हींमध्ये कार्बनचे बंध असतात. या बंधांना तोडण्याचं काम या अळ्या करतात. यावर सध्या आणखी संशोधन सुरु आहे.

मंडळी, अशाच प्रकारच्या अळ्या २०१५ च्या सुमारास चीन मधल्या वैज्ञानिकांनी शोधून काढल्या होत्या. या अळ्यांच्या पोटात विशिष्ट प्रकारचे जीवाणू आढळून आले ज्यामुळे प्लास्टिकचे विघटन होते. आश्चर्य म्हणजे प्लास्टिक खाऊन या अळ्यांच्या आरोग्यवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. या अळ्या प्लास्टिकचं रुपांतर कार्बन डायऑक्साइड, बायोमास आणि वेस्टमध्ये करतात. त्यामुळे हे एकप्रकारे खत म्हणून वापरता येतं.

स्रोत

मंडळी हे तर देशाबाहेरील झालं पण आपल्या महाराष्ट्रात याआधीच डॉक्टर राहुल मराठे यांनी अशाच प्रकारचा शोध लावला आहे. त्यांना एका विशिष्ट प्रकारच्या सुरवंटाचा शोध लागला जो प्लास्टिक पचवू शकतो.

राहुल मराठे हे त्यांच्या ‘मित्रकिडा’ संस्थेतर्फे सेंद्रिय शेतीसाठी कीटक पुरवण्याचं काम करतात. त्यांनी एकदा किटकांसाठी बनवण्यात आलेल्या प्लास्टिक बॅग्स मध्ये एका विशिष्ट जातीच्या कीटकांना ठेवलं. काही दिवसांनी त्या कीटकांनी प्लास्टिक कुरतडलेलं आढळलं. कीटकांनी प्लास्टिक फक्त कुरतडलेलं नव्हतं तर ते खाल्लही होतं. इथूनच या संशोधनाला सुरुवात झाली. 

स्रोत

मंडळी, या संशोधनांना जर यश आलं तर भविष्यातील प्लास्टिक समस्येला मोठ्या प्रमाणात आळा बसेल. पण याचा अर्थ असा नाही हा की आपण प्लास्टिक बेफिकीरपणे वापरात राहावं. प्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण हे असलंच पाहिजे.

जो पर्यंत हे संशोधन पूर्ण होत नाही तो पर्यंत आपणच प्लास्टिकचा वापर कमी करूया आणि प्लास्टिकला पर्याय शोधूया.

सबस्क्राईब करा

* indicates required