'चांद्रयान-२' च्या नजरेतून अशी दिसते पृथ्वी....हे ५ अफलातून फोटो बघून घ्या !!

मंडळी, चांद्रयान मोहिमेने अवकाशात भरारी घेऊन २ आठवडे झाले आहेत. एकेक टप्पा पार करत चांद्रयान चंद्राच्या भूमीवर उतरणार आहे. सध्या यान पृथ्वीच्या कक्षेत फिरत आहे. यावेळी विक्रम लँडरने टिपलेले फोटो काल इस्रोने ट्विट केले. हे फोटो विक्रम लँडरच्या अत्याधुनिक LI4 कॅमेऱ्यातून टिपण्यात आलेत.

चला तर हे फोटो पाहून घ्या.

मंडळी, हे फोटो पृथ्वीपासून ५००० किलोमीटरवरून काढण्यात आलेत. फोटोत दिसणारा पृथ्वीचा भाग हा अमेरिका आहे. याखेरीज प्रशांत महासागर पण आपण पाहू शकतो. हे फोटो अगदी स्पष्ट आहेत. यावरूनच मोहीम योग्यरीतीने मार्गक्रमण करत आहे हे दिसून येतं.

१४ ऑगस्ट रोजी यान चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण करेल. ठरवल्याप्रमाणे चंद्राच्या कक्षेत २० तारखेला प्रवेश करणार आहे. सगळं काही सुरळीत राहिलं तर ७ सप्टेंबर रोजी ही ऐतिहासिक मोहीम चंद्रावर पहिलं पाऊल ठेवेल.

मंडळी, ७ सप्टेंबर म्हणजे एक महिन्यानंतर तो क्षण आपण सगळे बघूच. तूर्तास तुम्हाला पृथ्वीचे फोटो कसे वाटले ते नक्की सांगा !!

 

आणखी वाचा :

व्हिडीओ ऑफ दि डे : भारताच्या 'चांद्रयान-२'चं यशस्वी प्रक्षेपण....हा ऐतिहासिक क्षण या व्हिडीओ मध्ये पाहा !!

म्हणून कोणीही न गेलेल्या चंद्राच्या दक्षिण भागात भारताने यान पाठवलं आहे...

सबस्क्राईब करा

* indicates required