computer

डेंग्यूचा नवा व्हेरिएंट धोकादायक का आहे?डेंग्यूच्या आणि कोरोनाच्या लक्षणातला फरक कसा ओळखावा?

कोरोनाचे रुग्ण देशभर कमी होत आहेत. लसीकरणाचा टक्काही सुधारत आहे. या कारणांनी देशवासियांना दिलासा मिळत आहे. पण डेंग्यूचा देशभर वाढत असलेला प्रसार बघून अनेकांना चिंता होत आहे. गेल्या काही वर्षात डेंग्यू हा आजार आटोक्यात आलेला दिसत होता. पण आता कधी नव्हे इतक्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण दिसून येत आहे. त्यातही चिंताजनक बाब म्हणजे यात असलेला डेंग्यूचा नविन व्हेरिएंट!!!

तज्ञांच्या मतानुसार डेंग्यूचा नविन व्हेरिएंट देशातील ११ राज्यांत दिसून आला आहे. यामुळेच डेंग्यू रुग्णांमध्ये वाढ दिसून येत आहे. यात डेंग्यू झाल्यावर अनेकांना येणारी शंका म्हणजे आपल्याला कोरोना तर नसेल? यामुळे चिंतेत अधिकच भर पडते. या ११ राज्यांमध्ये महाराष्ट्र, केरळ, उत्तरप्रदेश, ओडिसा यांचा समावेश आहे.

रिपार्ट्सनुसार डेंग्यूच्या चार सिरोटाइपपैकी DENV 2 आणि D2 स्ट्रेन जास्त प्रचलित आहेत. परिस्थितीला गंभीर करण्यात हेच कारणीभूत आहेत. आयसीएमआरचे संचालक बलराम भार्गव यांनी म्हटले आहे की हा स्ट्रेन धोकेदायक आहे, तसेच मृत्युदर वाढविण्यातदेखील याचा हातभार आहे. उत्तरप्रदेशात यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

सर्वात जास्त गंभीरता D2 च्या प्रकारांत दिसून येत आहे. काही ठिकाणी तर लहान मुलांना दवाखान्यात ऍडमिट करावे लागले आहे. संबंधित अधिकारी सांगतात की, "डासांमुळे D2 चे संक्रमण होत आहे. DENV मध्ये तीव्र किंवा हल्का ताप असतो. DENV चे विशेष स्ट्रेन जसे D2, गंभीर लक्षणांशी संबंधित आहे. वेळीच हे रोखले गेले नाहीतर यामुळे मृत्यूसुद्धा होऊ शकतो."

डेंग्यू वायरसच्या संक्रमणात कोविडसदृश लक्षणे असतात. ही रोगाला अधिक खतरनाक बनवतात. तज्ञांचे म्हणणे आहे की, डेंग्यू स्ट्रेनच्या उपस्थितीचा अर्थ आहे की, जे लोक आधीच संक्रमित झाले आहेत, ते अजून एकदा संक्रमित होऊ शकतात. त्यातही DENV 2 अशा व्यक्तीसाठी अधिक धोकादायक आहे जो आधीच डेंग्यूच्या एक सिरोटाइपपासून संक्रमित झाला आहे.

यात व्यक्तीला असलेली लक्षणे नेमकी डेंग्यूची आहेत की कोरोनाची? याबद्दल असं सांगता येतं की डेंग्यू संक्रमणात तीव्र ताप, गंभीर डोकेदुखी, गुडखेदुखी तसेच पोटदुखीसारखी गॅस्ट्रो इन्स्टेनाईल लक्षणं असू शकतात. तर कोरोनात ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास, अशक्तपणा अशी लक्षणे असतात.

जर व्यक्तीला वास किंवा चव येण्यास अडचण असेल, तसेच श्वास घेण्यास अडचण असेल तर ही लक्षणे कोरोनाची आहेत, डेंग्यूची नाही. डेंग्यू सहसा डोकेदुखी आणि अशक्तपणाने सुरू होत असतो. डेंग्यूपासून वाचण्याचा सर्वात जवळचा उपाय म्हणजे उपचार घेण्यात उशीर करू नये हाच सांगता येईल.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required