१९६३ च्या परेडमध्ये सहभागी झाला होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ?

भारताच्या प्रजासत्ताक दिनाचं एक मोठं आकर्षण असतं ते म्हणजे राजपथ वरची परेड. भारताची मिलिटरी कौशल्यं दाखवणारे खेळ,  शिवाय  प्रत्येक राज्यांचे असणारे चित्ररथ पण एकापेक्षा एक भारी असायचे.

तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका परेडबद्दल सांगणार आहोत. १९६३ साली जी परेड झाली त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ३५०० स्वयंसेवक सहभागी झाले होते. नुकतंच भारताचं चीनसोबत चालू असलेलं युद्ध संपलं होतं. त्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. त्यातच युद्धाच्या काळात संघाने केलेल्या मदतीबद्दल आभार मानण्यासाठी खास नेहरूंनी आमंत्रण दिलं होतं, असं संघाच्या प्रवक्त्यांचं म्हणणं आहे.  


या घटनेचा वर दिलेला एकच फोटो सापडतो. त्यामुळे ही घटना घडली कि नाही याबद्दलही वाद आहे. त्यामुळे आम्हीही या प्रकरणाची शहानिशा करायचं ठरवलं पण याबद्दल फारशी माहिती काही मिळत नाही. कोणत्याही शासकीय विभागाने याची माहिती उपलब्ध केलेली नाही. तुम्हांला काही माहिती आहे का याबद्दल? असेल तर आम्हांलाही सांगा, नक्की काय घडलं तेव्हा ते..

सबस्क्राईब करा

* indicates required