computer

मतमोजणी कशी केली जाते ? वाचा ९ महत्वाचे मुद्दे !!

मंडळी, आज २०१९ च्या लोकसभा निवडणुकांचा निकाल लागणार आहे. मतमोजणी संपून निकाल लवकरच हाती येतील, पण त्यापूर्वी मतमोजणी नेमकी कशी केली जाते ते पाहून घ्या.

१. मतमोजणीच्या वेळी निवडणूक अधिकाऱ्यांचं पोस्टिंग कोणत्याही जागी केलं जातं.

२.. मतांची गुप्तता पाळण्यासाठी मतमोजणी सुरु होण्यापूर्वी निवडणूक अधिकारी आणि उप निवडणूक अधिकारी शपथ घेतात.

३. निवडणूक अधिकाऱ्याच्या उपस्थितीत मतमोजणी पूर्वी EVM मशीन तपासण्यात येते.

४. उमेदवारांच्या प्रतिनिधींना मतमोजणी केंद्राजवळ येण्याची आणि मतमोजणीवर नजर ठेवण्याची परवानगी असते. मतमोजणी केंद्रावर असलेल्या प्रत्येक टेबल जवळ मतमोजणी पर्यवेक्षक (counting supervisor ) आणि उमेदवारांनी नियुक्त केलेला प्रतिनिधी असतो.

५. देशभरात मतदान सुरु होण्यापूर्वी सैन्यात काम करणारे अधिकारी, सैनिक या सारख्या आधिकारिक पदावर असलेल्या व्यक्तींकडून पोस्टल बॅलेट्सद्वारे मतदान करून घेतलं जातं. मतमोजणीच्या वेळी या  पोस्टल बॅलेट्सना सर्वात आधी मोजलं जातं. त्यानंतर EVM मशीन मधली मतं मोजली जातात. हे सर्व निवडणूक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली होत असतं.

६. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनंतर मतमोजणी पर्यवेक्षक आणि प्रतिनिधी/उमेदवारांकडून सह्या घेतल्या जातात. यानंतर निवडणूक अधिकारी सही करतो. निवडणूक अधिकाऱ्याच्या सही नंतर निकाल जाहीर केला जातो.

७. या सगळ्या प्रक्रियेवर कॅमेऱ्याची नजर असते.

८. आपण म्हणतो की फक्त EVM मशीनद्वारे मतदान केलं जातं, पण मतदानात VVPAT सिस्टमचा पण वापर केला जातो. VVPAT सिस्टमने मतदान केल्यावर एक स्लीप मिळते. अशाप्रकारे संपूर्णपणे EVM वर अवलंबून राहण्याचा धोका टळतो. मतमोजणी करताना त्या त्या केंद्रवरील कोणत्याही ५ VVPAT सिस्टमची तपासणी केली जाते.

९. EVM मशीन आणि VVPAT सिस्टममध्ये तफावत आढळली तर पुन्हा एकदा मोजणी केली जाते आणि यावेळी स्लीपवरची निवडणूक चिन्हं लक्षपूर्वक तपासली जातात. समजा फरक जाणवला तर VVPAT स्लीप्स ग्राह्य धरल्या जातात.

तर मंडळी, जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीत अशा प्रकारे मतमोजणी केली जाते.

सबस्क्राईब करा

* indicates required