computer

'सूर्यवंशम'ला झाली २० वर्ष पूर्ण...हे मिम्स नाही बघितले तर काय बघितलं !!

मंडळी, २१ मे हा फार महत्वाचा दिवस आहे. याच दिवशी....हो, याच दिवशी सिनेमा जगतात अजरामर ठरलेला “सूर्यवंशम” सिनेमा रिलीज झाला होता. हिरोचे डबल रोल असलेले कित्येक सिनेमे आले आणि गेले पण अमिताभ बच्चन यांच्या सूर्यवंशमची सर कोणालाच नाही.

पन्नाशीला आलेल्या अमिताभ बच्चन यांनी तरुण हिरा ठाकूरचा रोल केला होता. तोंडावर थोड्याफार सुरकुत्या दिसल्या म्हणून काय झालं? बिग बी, बिग बीच्च राहणार. साऊथ इंडियन मसाला असला तरी तो इंडियन आहे हे विसरून चालणार नाही राव. साधा बसमालक लोकांना प्रेशर कुकर कसा वाटू शकतो असा प्रश्न पडला असेल, तर तुम्ही सिनेमा प्रेमीच नाही... असो.

राव, ते म्हणतात ना काही गोष्टी हळू हळू समजतात. सुर्यवंशमचं पण तसंच झालं. सिनेमा रिलीज झाला तेव्हा सिनेमा सडकून आपटला होता. (काही लोक सूर्यवंशमच्या कथानकाला नावं ठेवतील पण त्यांचं ऐकायचं नाही.)  पण सिनेमा जेव्हा टीव्हीवर आला तेव्हा लोकांच्या उड्या पडल्या होत्या.

तर, जोक बाजूला ठेवूया. आज तब्बल २० वर्षांनी पण या सिनेमाची क्रेझ गेलेली नाही. लोक तेव्हाही सूर्यवंशमला नावं ठेवत होते आणि आजही ठेवत आहेत. चांगली गोष्ट ही आहे की हा सोशल मिडियाचा जमाना आहे. सूर्यवंशमच्या विशीच्या निमित्ताने लोकांनी मजेशीर मिम्स बनवले आहेत. हे मिम्स सूर्यवंशमपेक्षा चांगले आहेत. बघा तर.....

 

मंडळी, तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की हे सेट मॅक्सवाले सतत सुर्यवंशम का लावतात? तर खालील लेख नक्की वाचा..

सेट मॅक्स वाले सतत सूर्यवंशम का दाखवतात!! हे आहे ते कारण !!

तर मंडळी, तुम्ही सुर्यवंशम पहिल्यांदा कधी बघितला होता ? सूर्यवंशम तुम्हाला आवडतो का? सांगा बरं