बापरे, हे सेट मॅक्स वाले सतत सुर्यवंशम का दाखवतात!! हे आहे ते कारण !!

सेट मॅक्स आणि सुर्यवंशम याचं नातं म्हणजे अगदी भानुप्रताप आणि हिरा ठाकूर यांच्या सारखंच आहे. दोघेही एकमेकांशिवाय आधारे अधुरे वाटतात. राव, गेल्या १० पेक्षा जास्त वर्षांपासून सेट मॅक्स सुर्यवंशम यांची एक जबरदस्त केमिस्ट्री तयार झाली आहे. दिवस कोणताही असो, महिना कोणताही असो सेट मॅक्सवर सुर्यवंशम दिसल्या शिवाय राहत नाही. यावर सोशल मिडीयावर किती खतरनाक जोक तयार झालेत त्याबद्दल वेगळं सांगायला नको. असो...

स्रोत

राव सुर्यवंशममुळे आपल्या सारख्या सामान्य प्रेक्षकांना एक प्रश्न मात्र सतावतो तो म्हणजे “या सेट मॅक्सवाल्यांना दुसरा पिच्चर भेटत नाय का...सारखं आपलं सुर्यवंशम लावून बसलेले असतात’

राव या पाठी एक मोठं कारण आहे जे आजवर कोणालाही माहित नव्हतं. कारण वाचून तुम्ही सुद्धा म्हणाल सेट मॅक्सवाले दिसतात तेवढे येडे नाहीत भौ....

२१ मे, १९९९ साली सुर्यवंशम रिलीज झाला. त्या गोष्टीला यावर्षी १९ वर्ष पूर्ण होत आहेत. मंडळी, हा सिनेमा ज्या वर्षी रिलीज झाला त्याच वर्षी सेट मॅक्स चॅनल लाँच झालं होतं. लाँच झाल्या झाल्या सेट मॅक्सने तब्बल १०० वर्षांसाठी सुर्यवंशमच्या टेलिकस्टचे हक्क विकत घेतले. या हक्कामुळे सेट मॅक्स १०० वर्ष केव्हाही सुर्यवंशम टेलिकास्ट करू शकतं. आता तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेलच. 

स्रोत

मंडळी १०० वर्षांचा करार असल्याने हा चित्रपट सारखा सारखा दाखवून त्यातून टीआरपी गोळा केली जाते. आता तुम्हीच सांगा एवढे पैसे भरून हक्क विकत घेतलेत मग त्याचा फायदा नको का व्हायला. सोन्याची कोंबडी आहे ही भाऊ. आणि हो, आपण जे मिम आणि जोक्स शेअर करतो ना त्याचा सुर्यवंशमच्या टीआरपीला चांगलाच फायदा होतो बरं का. त्यामुळे हा चित्रपट असाच चालू राहणार आहे.

म्हणजे शेवटी काय तर हा चित्रपट आपल्याला आणखी ८१ वर्ष सहन करावा लागेल. अर्थात एका संपूर्ण पिढीवर हा अत्याचार असेल राव !!

 

आणखी वाचा :

सूर्यवंशम मधला हा लहान मुलगा आठवतोय का ? १८ वर्षानंतर तो आता असा दिसतो !!

सबस्क्राईब करा

* indicates required