computer

अमेरिकन निवडणुकांबद्दल काही गमती: हिलरी पहिली महिला उमेदवार नाही!

सगळ्या राज्यांचे निकाल आल्यावर तुमच्याकडे येऊच, तोवर जाणून घ्या काही गमतीशीर बाबी:

१८५६ पर्यंत अमेरिकेत मतदान करायला तुमच्याकडे काही स्थावर मालमत्ता (असेट्स) असणं बंधनकारक होतं .

राष्ट्रपती शपथ घेताना बायबल किंवा कोणते पुस्तक घ्यायचे ते ठरवू शकतो. ओबामांनी दोन बायबल्स घेतली होती - लिंकन बायबल आणि मार्टिन ल्युथर किंग ज्यू. बायबल.

1870 साली आफ्रिकन अमेरिकन पुरुषांना कागदोपत्री मतदानाचा हक्क मिळाला. मात्र हरेक राज्यात ते मतदान करू शकेपर्यंत 1960 उजाडलं.

जॉर्ज वोशिंग्टन हा एकमेव राष्ट्रपती ज्याला 100% मते मिळाली. कारण ती पहिलीच निवडणूक होती आणि कोणीच विरोधात उभं नव्हतं. पण तरी त्याने आपलं सगळं बजेट 160 गॅलन दारू वाटण्यात खर्च केलं असं म्हणतात.

किती मतदार उत्साही आहेत आणि कितीजण मतदान करतात हे बघायचं तर मतदान करणाऱ्या 172 देशांच्या यादीत अमेरिका 137व्या स्थानावर आहे.

हिलरी पहिली महिला उमेदवार आहे? नाही.१८७२मध्येच व्हिक्टोरिया वूडहल ही महिला उमेदवार अध्यक्षपदासाठी उभी होती. आजवर 200 महिला उमेदवार होऊन गेल्या आहेत. मात्र त्या अपक्ष म्हणून उभ्या होत्या किंवा लहान पक्षांकडून. हिलरी मुख्य दोन पक्षांपैकी एकाची उमेदवार.

महिलांना मतदानाचा अधिकार १९२०ला मिळाला.

सबस्क्राईब करा

* indicates required