मुंबईशी नातं असलेला हा 'गे' व्यक्ती बनू शकतो आयर्लंडचा पंतप्रधान !! 

आपल्या भारतीय लोकांचं एक वैशिष्ट्य आहे बुवा. जगात कूठेही गेले तरी तीथे आपल्या कर्तृत्वाचा झेंडा गाढल्याशिवाय राहणार नाहीत. संशोधन, राजकारण, व्यवसाय... कोणतंही क्षेत्र घ्या. भारतीय सबसे आगे आहेत. 

मंडळी आयर्लंडमध्येही सद्या हवा वाहतीये ती लियो वरडकर या नावाची. हा माणूस भारतीय वंशाचा आहे आणि पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे धावताना दिसतोय. आयर्लंडचे पंतप्रधान एंडा केनी यांनी नुकताच राजीनामा दिलाय. त्यामुळे त्यांच्याच पक्षाच्या लीयो यांनी या पदासाठी उमेदवारी जाहीर केलीये. त्यांना कॅबिनेटचं मोठं समर्थनही मिळत आहे. त्यामुळे आयर्लंडच्या पंतप्रधानपदासाठी लीयोंचं नाव आघाडीवर आहे.

स्त्रोत

३८ वर्षीय लियो हे सद्या तिथे सोशल प्रोटेक्शन मिनिस्टर आहेत. विशेष म्हणजे आयर्लंडमधले ते पहिले समलैंगिक (गे) मंत्री आहेत! यांनी स्वतः एका रेडीओ मुलाखतीत हे कबुल केलंय बरं का!! तीथे त्यांनी समलैंगिक विवाह मान्यतेसाठी बर्‍याच चळवळीही केल्यात, ज्याचं यश म्हणुन जगात पहिल्यांदा आयर्लंडमध्ये समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता मिळाली. त्यांच्या समलैंगिक जोडीदाराचं नाव आहे डॉ. मॅथ्यू बॅरेट.

स्त्रोत

राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी लियो वरडकर ज्युनियर डॉक्टर म्हणून काम करायचे. २००७ मध्ये त्यांनी राजकारणात उडी घेतली. याआधी ते टुरिझम आणि स्पोर्ट्स मिनिस्टर होते. त्यांचे वडिल अशोक हे १९६० मध्ये मुंबई सोडून इंग्लंडला स्थायिक झाले होते आणि तिथे त्यांनी एका आयरिश मुलीशी लग्न केलं. त्यामुळे लांबचं का असेना, पण लियोंचं भारत कनेक्शन लक्षात घेऊन आपल्या सर्वांकडून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया...

सबस्क्राईब करा

* indicates required