निवृत्तीनंतरचे राष्ट्रपतींचे आयुष्य कसे असते ?

भारताचा भावी राष्ट्रपती निवडण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. २४ जुलै रोजी आपले पूर्व राष्ट्रपती प्रणव मुखर्जी निवृत्त होणार आहेत. आपल्या मनात प्रश्न असेलच की निवृत्तीनंतर प्रणव मुखर्जी किंवा इतर राष्ट्रपतींना कोणत्या सुविधा मिळतात? रिटायरमेंट नंतर त्यांना पेन्शन मिळतं का? याच सर्व प्रश्नांचा घेतलेला हा आढावा..


राष्ट्रपती पद सोडल्यानंतरचं जीवन

Image result for 10 rajaji marg delhiस्रोत

‘प्रेसिडेंट इमॉल्युमेंट अॅक्ट १९५१’ या कायद्यानुसार पूर्व राष्ट्रपतीला पूर्ण सन्मानानुसार राहण्यास सुसज्ज घर मिळते. त्याचबरोबर २ टेलिफोन, एक नॅशनल रोमिंग फ्री मोबाईल फोन, १ सेक्रेटरी आणि ४ खाजगी कर्मचारी, ऑफिस खर्चासाठी प्रत्येकी वर्षाला ६०,०००, एक कार आणि ७५ हजार रुपये (पूर्ण सॅलरीचे अर्धे) पेन्शन देण्यात येते. या सर्व सुविधा रिटायरमेंटनंतर प्रणव मुखर्जींना मिळणार आहेत. कायद्यानुसार वैद्यकीय सेवा तसेच पूर्ण देशात कुठेही फिरण्याची मोफत सुविधा पूर्व-राष्ट्रपतींना मिळते. रेल्वे, विमान, जहाज, इ. अशा देशभरात केलेल्या कोणत्याही प्रवासात राष्ट्रपतींना प्रथम श्रेणीत प्रवास करण्याची मुभा आहे.


प्रणव मुखर्जींचा पुढील कार्यक्रम

Image result for pranab mukherjee in travelस्रोत

१० राजाजी मार्ग या दिल्लीतल्या निवासस्थानी प्रणव मुखर्जी यापुढे राहणार आहेत. एकेकाळी या बंगल्यातच  एपीजे अब्दुल कलामजी राहत होते. या नव्या घरात प्रणव मुखर्जी आपला पूर्ण वेळ वाचन आणि लिखाण यात घालवणार आहेत. त्यांच्या पुढील जीवनासाठी या बंगल्यात पूर्ण व्यवस्था केली गेली आहे. मुखर्जींनी स्वतः सांगितल्याप्रमाणे ते देशभर प्रवास करणार आहेत.

 

आज ५ वाजेपर्यंत नव्या राष्ट्रपतींची घोषणा होणार असून हे नवे राष्ट्रपती कोण असतील याची उत्सुकता आहे !

सबस्क्राईब करा

* indicates required