computer

धोनीच्या अफलातून स्टंपिंग्स....त्याने पहिल्यांदा कोणाची दंडी उडवली होती, माहित्ये का?

सर्वांचा लाडका थाला म्हणजेच महेंद्र सिंग धोनी एक यशस्वी कॅप्टन आणि बॅट्समन असण्याबरोबर तितकाच यशस्वी विकेटकिपर देखील आहे. आपल्या करीष्म्याने त्याने भारताला अनेक स्पर्धा जिंकून दिल्या आहेत आणि त्याने आपल्या अफलातून चपळाईने अनेकांना स्टंपच्या मागून पॅव्हेलीअनचा रस्ता दाखवला आहे. आज अशाच त्याच्या काही भन्नाट विकेट किपिंगची उदाहरण बघणार आहोत.

१. जोनाथन ट्रॉट 

इंग्लन्डचा हा आघाडीचा बॅट्समन ऐनवेळी धोनीने आऊट केला नसता तर कदाचित त्यांनी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली असती. धोनीने बॉलिंग करणाऱ्या अश्विनला बॉल डाऊन द लेग साईड फेकायला सांगितला. धोनीने प्लॅननुसार हातात बॉल येताच ट्रॉटच्या दांड्या उडवल्या.

२. इयान बेल

ही गोष्ट देखील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधीलच आहे. फायनल सामना खेळत असताना इयान बेलला धोनीच्या वायूवेगाचा अनुभव आला होता. धोनीने जडेजाच्या बॉलिंगवर इयानला काही समजायच्या आत स्टंम्पवरील बेल उडवल्या होत्या.

३. साबीर रहमान

२०१६ चा टी ट्वेन्टी वर्ल्डकप सुरू असताना बांग्लादेश टीमला भारताविरुद्ध विजय मिळवण्यासाठी अवघ्या काही धावा हव्या होत्या. पण धोनीने रैनाच्या बॉलिंगवर रहमानच्या दांड्या उडवत त्यांची सर्व स्वप्नं धुळीस मिळवली होती.

४. तमीम इकबाल

बुमराहने इकबालचा झेल सोडल्यामुळे त्याला जीवदान मिळाले होते. पण हे जीवदान जास्त वेळ राहू शकले नाही. धोनीने इकबालचा पाय एक सेकंद बाहेर गेल्याबरोबर त्याच्या दांड्या उडवल्या होत्या.

५. किमो पॉल

धोनीने किमो पॉलला आऊट करून आपण विकेटकिपिंगचे बादशाह आहोत हे सिद्ध केले होते. त्याने अवघ्या 0.8 सेकंदात पॉलला आऊट केले होते. सर्वात कमी वेळात विकेट घेण्याचा हा विक्रम आजही धोनीच्या नावावर आहे.

६. टीम शिफर्ट

न्यूझिलंडविरुद्ध खेळत असताना धोनीने टीम शिफर्टला अवघ्या 0.9 सेकंदात आऊट केले होते.

७. जॉर्ज बेली

ऑस्ट्रेलियासोबत सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात धोनीने पापणी लवण्याच्या आत जॉर्ज बेलीला आऊट केले होते.

८. रजिन सालेह

धोनीने दांडी उडवलेला रजिन सालेह हा पहिला खेळाडू!!  तेदेखील सचिन तेंडुलकरच्या बॉलिंगवर. ही पहिलीच विकेट अफलातून होती. पुढे धोनी हिट झाल्यावर रजिन सालेह याने 'मी धोनीची पहिली विकेट होतो हे माझं भाग्य आहे' असं म्हटलं होतं.

९. ग्लेन मॅक्सवेल

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी ट्वेन्टी सामन्यात युवराज सिंगच्या बॉलिंगवर धोनीने चित्याच्या वेगाने मॅक्सवेलची दंडी उडवली होती.

१०. जॅकोब ओराम

२००९ साली न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय सिरीज मध्ये जेकबने युवराज सिंगच्या बॉलिंगवर हवेत बॉल मारण्याचा प्रयत्न केला पण तो फसला. धोनीने संधी साधून त्याच्या दांड्या उडवल्या.

११. मिशेल मार्श

ऑस्ट्रेलियाचा अजून एक खेळाडू धोनीच्या तडाख्यात सापडला होता. राहुल शर्माच्या बॉलिंगवर मार्श खेळणार, इतक्यात  धोनीने त्याला आऊट केले होते.

 

क्रिकेटबद्दल अशी आणखी कोणती माहिती तुम्हांला वाचायला आवडेल हे आम्हांला जरूर कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required