अशी बदलली वसुंधरा गेल्या २० वर्षात !!

Subscribe to Bobhata

मंडळी, नासाने नुकताच एक व्हिडीओ प्रसारित केलाय. यात पृथ्वीवर २० वर्षात झालेले बदल दाखवण्यात आले आहेत. वेगवेगळ्या उपग्रहांनी मिळवलेल्या माहितीतून हा व्हिडीओ तयार झालाय. पृथ्वी मागील २० वर्षात कशी बदलत गेली याचा सुंदर अनुभव हा व्हिडीओ देतो.

१९७० सालापासूनच उपग्रहांच्या मदतीने पृथ्वीचं निरीक्षण करण्याचं काम सुरु झालं. १९९७ साली ‘सी-व्हीविंग फील्ड ऑफ व्हीव सेंसर’ या जैव वैशिष्ट्यांवर अभ्यास आणि निरीक्षण करण्यासाठी प्रक्षेपित केलेल्या उपग्रहाने संपूर्ण पृथ्वीवरील महासागराचा आणि जमिनीचा सखोल अभ्यास करण्याची खऱ्या अर्थाने सुरुवात केली.

या व्हिडीओ मधून आपण बघू शकतो की प्रत्येक ऋतूनुसार पृथ्वीवर कसे बदल होत जातात. यातून हेही समजते की पृथ्वीच्या हवामानातील बदलानुसार २० वर्षात काय फरक पडला आहे. नासाने दिलेल्या माहिती नुसार वातावरणात कार्बन-डाईऑक्साइड वाढला आहे आणि महासागरातील पाण्याचं तापमान वाढलं आहे. या माहितीवरून वातावरणातील कार्बनच्या प्रमाणावर देखील नजर ठेवण्यास मदत होणार आहे.

नासाच्या 'गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटर'चे 'जीन कार्ल फेल्डमन' यांनी म्हटलं की “पृथ्वी रोज नवा श्वास घेते.” पृथ्वीचं बदललेलं रूप खरच अविश्वसनीय आहे. हे रूप तुम्ही सुद्धा बघा !!

सबस्क्राईब करा

* indicates required