computer

हे वापरतो रोजच पण याचा शोध कोणी लावला जाणून घ्या !

ज्याला आपण आता फक्त 'स्प्रे' म्हणतो त्याला शास्त्रीय भाषेत एरोसोल स्प्रे  म्हणतात.आता घरोघरी वापल्या जाणार्‍या 'स्प्रे'चा शोध आणि त्याचे पेटंट १९२६ साली एरीक रॉथीम या नॉर्वेत राहणार्‍या केमीकल एंजीनियरला मिळाले.अमेरीकेत याचे पेटंट त्याला मिळाल्यावर त्याने १००००० क्रोनर्समध्ये विकले.१९९८ साली या संशोधकाच्या गौरवार्थ  नॉर्वेच्या पोस्टाने एक पोस्टेज स्टँप काढला.

 

आधुनिक एरोसोल स्प्रे लोकप्रिय करण्याचे कार्य १९४९ साली लिल गुडह्यू आणि निल्यम सुलीव्हन  या दोन संशोधकांनी केले.दुसर्‍या महायुध्दात सैनीकांच्या तंबूत घोंगावणार्‍या डासांना मारण्यासाठी सुरुवातीला या एरोसोल स्प्रे कॅनचा वापर करण्यात आला म्हणून त्याला 'बग बाँब' असे म्हटले जायचे. या दोघांना पहिले एरीक रॉथीम सुवर्णपदक देऊन फेडरेशन ऑफ युरोपीयन एरोसोल असोसिएशन त्यांचा गौरव केला. 

सबस्क्राईब करा

* indicates required