आमचे येथे झुरळाचे पौष्टीक दूध मिळेल.

झुरळाचे पौष्टिक दूध हे शब्द वाचता वाचताच पोटात ढवळायला लागले असेल.अमेरिकेत आयोवा विद्यापीठात एस. रामस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करत असलेल्या एका शास्त्रज्ञाने झुरळाच्या पोटात आढळलेल्या काही स्फटिकांचा अभ्यास केल्यावर त्यांना असे आढळले की हे स्फटिक दुधामध्ये मिळणार्‍या प्रोटीन्सचे बनले आहेत आणि इतकेच नव्हे तर ह्या प्रोटीनचा उर्जांक सामान्य प्रोटीन्सच्या तिप्पट आहे. हे दुधाचे स्फटिक संपूर्ण अन्नासारखे आहेत.त्यात काही अंश स्निग्ध पदार्थाचे आणि अमीनो आम्लाचे आहेत.


ह्या शास्त्रज्ञाचे  काही खरे नाही. आज झुरळाचे दूध प्यायला सांगतील तर उद्या पालीची अंडी खायला सांगतील , असे तुमच्या मनात आले असेल किंवा  हे वाचताना तुमच्या डोळ्यासमोर लाखो झुरळ असलेले तबेले उभे राहीले असतील तर थांबा. मानवी वापरासाठी हे दूध रासायनिक पध्दतीने निर्माण करण्यात येणार आहे.त्याचा झुरळाशी काहीच संबंध नसणार आहे. पण मूळ रसायने झुरळाच्या पोटात मिळाली म्हणून कदाचित त्याला कॉक्रॉच मिल्क म्हणतीलही आणि दुकानांवर पाट्या वाचायला मिळतील " आमचे येथे झुरळाचे पौष्टीक दूध मिळेल.

सबस्क्राईब करा

* indicates required