computer

स्थलांतरीत फ्लेमिंगोंचे थवे मुंबई-नव्या मुंबईत आले आहेत, तुम्ही पाहायला गेलात की नाही?

मुंबईत वेळोवेळी बाहेरून पक्षी येत असतात. हे पक्षी बघण्यात जी मजा आहे तिला खरोखर तोड नाही. एकतर इतक्या दुरून देणाऱ्या पक्षांना बघणे, त्यातही त्यांची अतिशय सुंदरता डोळ्यात सामावून घेणे यासारखा दुसरा आनंद नाही. सध्या नवी मुंबईत निसर्गप्रेमींना हाच आनंद मिळत आहे.

सुंदर असे हे पक्षी आपल्या गुलाबी पिसांनी आणि घोड्यासारख्या पायांनी लक्ष खेचून घेतात. गुजरातमधील कच्छ आणि राजस्थानातील सांभर सरोवर येथून उडून थेट जीवाची मुंबई करायला हे पक्षी इकडे येत असतात. त्यांची येण्याची वेळ पण निश्चित असते. दरवर्षी याच काळात ते नवी मुंबईतील आर्द्र प्रदेशात, भांडुप येथील पंपिंग स्टेशन आणि ऐरोलीकडे येत असतात.

हजारो पक्षांचा ताफा येत असल्याने निसर्गप्रेमींसाठी तर ही मेजवानी असते. अनेक जण हा नजरा कॅमेऱ्यात कैद करतात आणि सोशल मीडियावर टाकतात. फ्लेमिंगो हा पक्षी पर्यावरणासाठी देखील उपयोगी आहे. फ्लेमिंगो एका ठिकाणी राहत नाहीत. ते पर्यावरण आणि पाणी पाहून आपल्या राहण्याचे ठिकाण बदलत असतात.

निसर्गप्रेमी सांगतात की गेल्या काही वर्षांमध्ये फ्लेमिंगो पक्षांच्या आगमनात वाढ झाली आहे. त्यांचे विविध रंगी रूप बघून खरी सुंदरता म्हणजे हीच हे कुणीही सांगेल. नवी मुंबई महापालिकेने तर फ्लेमिंगो सिटी म्हणून नवी मुंबई ओळखली जावी असा प्रस्ताव दिला आहे. कारण या ठिकाणी फ्लेमिंगो पाहण्यासाठी दुरदूरवरून लोक येत असतात. निसर्गप्रेमी आणि पर्यटक यांच्यासाठी फ्लेमिंगो हा कुतूहलाचा विषय आहे.

नोव्हेंबर ते जून या काळात या पक्षांना इथे पाहता येते. खरंतर फ्लेमिंगो हे गुलाबी म्हणून जन्माला येत नाहीत. सुरुवातीला एकतर ते करडे किंवा पांढरे असतात. त्यांच्या खाद्यातल्या केमिकल्समुळे त्याना हा छान गुलाबीसर रंग प्राप्त होतो.

काही म्हणा, मुंबई किंवा नव्या मुंबईत राहात असाल, तर फ्लेमिंगोंना पाहण्याची संधी दवडू नका..

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required