computer

टूथब्रश किती महिन्यांनी बदलावा ? बघा विज्ञान काय सांगतंय !!

भारतात दात घासण्याचा ब्रश निरुपयोगी झाला तरी त्याचे अनेक फायदे आहेत. ते काही वेगळं सांगायला नको. पण हा ब्रश निरुपयोगी झालाय किंवा त्याच्या जागी नवीन ब्रश घ्यावा लागेल हे कसं ठरवणार ? आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं, ‘दिवसातून २ वेळा दात घासले पाहिजेत’. पण ब्रश किती काळाने बदलायचा हे कोण सांगणार ? राव विज्ञानाकडे याचं उत्तर आहे. 

विज्ञान सांगतं की दर ३ ते ४ महिन्यांनी टूथब्रश बदलला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की ३ ते ४ महिने म्हणजे खूपच लवकर झालं !! याची करणं सुद्धा विज्ञानाकडे आहे. चला जाणून घेऊया.

१. ब्रशचा संपर्क रोजच दातांशी येत असल्याने साहजिकच ब्रशच्या आत बॅक्टेरीया जमा होत जातात. आपण जर ब्रश रोज धुवून ठेवत असलो तरी ३ ते ४ महिन्यापर्यंत ब्रश पूर्वी सारखा स्वच्छ राहत नाही.

२. घरातल्या सगळ्यांचे ब्रश जर एकत्र ठेवले जात असतील तर ब्रशवर बॅक्टेरीया जमा होण्याची शक्यता वाढते. संशोधकांच्या मते अनेक टूथब्रश एकत्र ठेवणे आरोग्यासाठी घातक आहे.

३. काहीजण टूथब्रश वापरून झाला की त्यावर कव्हर लावतात. पण त्यामुळे होतं असं की आतील ओलावा तसाच राहतो. उघड्या ब्रशवर जेवढे बॅक्टेरीया जमू शकतात तेवढेच बंद ब्रशवर जमतात.

४. ब्रश बदलण्याची वेळ आली आहे याचा पहिला संकेत ब्रश स्वतःच देतो. म्हणजे बघा, ब्रशचे केस पसरट होण्यास सुरुवात झाली की समजायचं ब्रश तुमचे दात नीट साफ करत नाहीये.

यासाठी एक छोटा प्रयोग करून बघा. दात घासून झाले की दातांवर जीभ फिरवायची. दात गुळगुळीत भासत नसतील तर ब्रश ला फेकण्याची वेळ आली आहे असं समजायचं.

दातांची काळजी घ्यायची असेल तर टूथब्रशची काळजी घेतलीच पाहिजे. दात घासल्यानंतर ब्रश धुऊन झाला की ब्रश उभा ठेवायला विसरू नका. ब्रश मधलं पाणी निघून गेल्यास बॅक्टेरीया तयार होण्यास बऱ्याच प्रमाणात आळा बसतो.

राव, ३ ते ४ महिन्यात ब्रश निरुपयोगी झाला म्हणून दुःखं करू नका कारण या ब्रशचे खरे उपयोग त्यानंतर सुरु होतात. केसांना डाय लावण्यासाठी, घरच्या लादितली घाण साफ करण्यासाठी. नाडा ओवण्यासाठी, भिंतींना कलर करण्यासाठी, इत्यादी गोष्टी या ब्रशने करता येतात. अश्या प्रकारे तुमचे पैसे नक्कीच वसूल होतील. आणखी आयडिया असतील तर कमेंट मध्ये सुचवा की राव !!

सबस्क्राईब करा

* indicates required