हिन्द महासागर आणि अटलांटिक महासागर : या दोन समुद्रांचं पाणी एकमेकांत का मिसळत नाही?

Subscribe to Bobhata

 

मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे की या पृथ्वीचा ७०% भाग हा पाण्याने व्यापलाय. यापैकी ९६% पाणी हे फक्त समुद्रांचं आहे. आणि त्याचबरोबर पृथ्वीवर ५ महासागरांनी पृथ्वीवरच्या जमिनीचं ७ खंडांमध्ये विभाजन केलंय. पण हे विशाल महासागर कुठे सुरू होऊन कुठे संपतात, त्यांची सीमा कोणती? याची अचूक माहिती अजूनही कोणाकडे नाही मंडळी. या समुद्रांचा अभ्यास अनेक संशोधक करत असतात, पण आतापर्यंत फक्त २०% भागाचाच अभ्यास करणं शक्य झालंय! राव, यावरून आपल्याला या महासागरांच्या अथांगतेची कल्पना येऊ शकते.

आता आपण मुख्य मुद्द्याकडे वळूया.
सोशल मिडीयावर फिरणार्‍या फोटो आणि व्हिडीओमधून तुम्ही एक ठिकाण पाहिलंच असेल, जिथं दोन समुद्रांचा संगम तर झालाय, म्हणजेच दोन समुद्र एकत्र आलेत.. पण त्यांचं पाणी मात्र एकमेकांत मिसळत नाहीये. दोन्ही पाण्यांचा रंगही वेगळा आहे आणि दोन्ही समुद्रांचं पाणी असं विभागलं गेलंय की जणू त्या दोन्ही समुद्रांच्या मध्यभागी एखादी भिंत उभी आहे! या अदभूत जागेचा फोटो सर्वप्रथम २०१० मध्ये केंट स्मिथ या व्यक्तीने टिपला होता.

स्त्रोत

फोटो आणि व्हिडीओत दिसणारे हे दोन समुद्र म्हणजे हिंदी महासागर आणि अटलांटिक महासागर आहेत मंडळी. हे दोन्ही महासागर  चमत्कारिक पध्दतीने अलास्काच्या खाडीमध्ये एकत्र येतात. त्यांचं पाणी असं वेगवेगळं दिसण्यामागे कारणं आहे - या दोन्ही पाण्यांची वेगवेगळी घनता, वेगवेगळं तापमान आणि वेगवेगळी लवणता (क्षाराचं प्रमाण). संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार यापैकी एका महासागरात बर्फ वितळून बनलेलं ग्लेशियरचं गोड पाणी आहे, तर दुसर्‍या समुद्राचं पाणी हे अनेक नद्यांचं एकत्र आलेलं आणि जास्त खारं आहे. हे दोन्ही समुद्र जिथं एकत्र येतात, त्याठिकाणी फेसाची एक रेषा निर्माण होते. त्याचप्रमाणं वेगवेगळ्या घनतेच्या पाण्यावर
सूर्यप्रकाश पडल्यानंतर त्यांचा रंगही वेगवेगळा म्हणजेच हलका निळा आणि गडद निळा दिसतो. यामुळेच इथं दोन्ही समुद्र वेगवेगळ्या रंगांचे भासतात.

दिसताना हे असं वेगवेगळं दिसत असलं तरी, कुठे ना कुठे हे पाणी मिसळत असणारच मंडळी. लोकांनी या ठिकाणाला पौराणिक कथांशी जोडून चमत्काराची उपमाही दिलीये. पण यामागे ही वैज्ञानिक कारणं आहेत.

आता माहिती आवडली आहेच, तर शेअरही करून टाका...