सुरक्षित पासवर्ड कसा निवडाल ?वाचा सहजसोप्या १२ टीप्स!! तुमचा पासवर्ड बदलण्याची वेळ झालीच आहे. हो ना?
डिजिटल युगात पासवर्ड आजकाल सगळीकडेच लागतो. म्हणजे इमेल, ऑनलाईन बँकिंग, कार्ड्स, APP ,सोशल मिडिया अकाउंटसाठी पासवर्ड तर असतातच. अगदी कुठेही अकाउंट उघडले तरी पासवर्डशिवाय काम होत नाही. हा पासवर्ड सुरक्षित असणेही तितकेच महत्वाचे असते. पण कंटाळा किंवा अवघड काम म्हणून किचकट पासवर्ड ठेवणे आपण टाळतो. पण तुम्हाला सांगणे महत्वाचे आहे की सायबर क्राईम हे बहुतांश वेळ अगदी सोपा पासवर्ड ठेवल्याने घडले आहेत. त्यामुळे आज आम्ही अश्या काही टिप्स देत आहोत ज्यामुळे तुमचा पासवर्ड सुरक्षित राहू शकतो.
१. सुरक्षित पासवर्ड तयार करण्यासाठी तुम्ही कीबोर्डमध्ये दिलेले विशेष वर्ण वापरणे आवश्यक आहे. $,*,^ अशी अक्षरे पासवर्डमध्ये असायलाच हवीत . पासवर्डमध्ये कॅपिटल आणि लहान अक्षरे, संख्या आणि विशेष वर्ण मिसळले तर अधिक फायदेशीर ठरते.
२. सहज लक्षात ठेवण्यासाठी, तुम्ही तुम्हाला आठवत असलेल्या शब्दापासून सुरुवात करू शकता. काही अक्षरांसाठी संख्या लिहू शकता. म्हणजे एस ऐवजी $,to ऐवजी 2 अंक वापरू शकता आणि शून्यसाठी “O” लिहून पासवर्डचा नेमका अंदाज बांधणे अवघड करू शकता.
३. खूप जणांचे पासवर्ड ही त्यांची जन्मतारीख असते, कधी जोडीदाराचे नाव, कधी घरातल्या कुत्र्या-मांजराचे नाव, 'जय गणेश', मुलांची नावे, गाडीचा नंबर असे पावर्ड ठेवलेत तर अशा पासवर्डचा अंदाज लगेच लावता येऊ शकतो. नावानंतर १२३ असे आकडे टाकणारे ही खूप जण असतात. असे सहज ओळखू येणारे पासवर्ड अजिबात निवडू नका.
४. आजकाल ऑनलाइन इतकी खाती तयार करावी लागतात की पासवर्ड लक्षात ठेवता येत नाही. मग प्रत्येक कामासाठी वेगळा पासवर्ड बनवणे आणि तो लक्षात ठेवणे हे खूप कठीण काम होते. म्हणून तुम्ही वेबसाइटनुसार पासवर्ड निवडू शकता. त्यात विशेष चिन्ह वापरा.
५. कोणताही पासवर्ड तयार करताना, तुम्ही तुमच्या पासवर्डमध्ये कमीत कमी दोन कॅपिटल अक्षरे आणि लहान अक्षरांचे शब्द निवडा. किमान १० अक्षरे असलेला पासवर्ड ओळखणे थोडे कठीण जाते.
६.पासवर्ड तयार करताना क्रमिक वर्णमाला किंवा संख्या वापरू नका. 1234, W X Y Z, ABCD प्रमाणे क्रमिक वर्णमाला किंवा अंक वापरलेत तर ते लोकांना हॅक करणे सोपे करते.
७. मुद्दाम चुकीचे स्पेलिंग लिहा. जसे AKSHAY चे AsHKaY असे करता येईल. समजा ठिकाणाचे नाव वापरणार असाल तर त्याचेही चुकीचे स्पेलिंग करून ते वापरावे. ज्यामुळे कोणीही सहज अंदाज लावू शकणार नाही.
८. तुम्ही गुगल सर्च करून आणि स्ट्राँग पासवर्ड जनरेटर वेबसाइटला भेट देऊन पासवर्ड तयार करू शकता. तिथे तुम्हाला नवे पर्याय सुचवले जातील. अधिक सुरक्षित पासवर्ड निवडणे सोपे जाईल.
९. बऱ्याच वेबसाईट वर security questions किंवा सुरक्षा प्रश्नांची उत्तरे देऊन तुम्ही विसरलेला पासवर्ड परत मिळवू शकता किंवा रीसेट करू शकता. त्यामुळे नवीन लॉगिन सेट करताना सुरक्षा प्रश्न नीट भरा.
१०. तुमचा पासवर्ड दर सहा महिन्यांनी अवश्य बदला. ते बदलण्यासाठी मोबाईलवर अलार्म reminder तारीख सेट करा. अनेकजण वर्षानुवर्षे तोच पासवर्ड वापरतात. पण हे चुकीचे आहे. तुमचे खाते सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्ड दर सहा महिन्यांनी बदला.
११. पासवर्ड मॅनेजर टूल हे पासवर्ड सुरक्षा वाढविण्यासाठी उत्तम साधन आहे. हे टूल पासवर्ड सेव्ह करतेच याशिवाय सुरक्षित पासवर्ड सुचवते. पासवर्ड मॅनेजर त्याच्या वापरकर्त्यांसाठी एका साध्या प्लग-इनद्वारे पासवर्ड ऑटो फील करू शकतो. त्यामुळे पासवर्डची सुरक्षितता वाढवण्यासाठी ही एक अत्यंत सोपी पद्धत आहे. तुम्ही गुगलवर हे टूल शोधू शकता.
१२. CAPTCHA कॅप्चा वापरणे हा आणखी एक सुरक्षित उपाय आहे. एखाद्या अनोळखी व्यक्तीला ज्याला तुमचं अकाउंट ऍक्सेस करायचं आहे त्याला तुमच्या अकाउंटमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी CAPTCHA कोड विचारला जातो. गुगल आता नवीन CAPTCHA वापरतात. ज्यामध्ये केलेली विनंती ही माणसाकडून केली जात आहे की संगणक बॉट काही छेडखानी करतोय हे सहज समजते.
शीतल दरंदळे




