computer

एकाच सूर्याची अनेक रूपे....नासाने पोस्ट केलेल्या फोटोंचं कौतुक का होत आहे?

तुम्ही जर आकाशात घडणाऱ्या गोष्टींबद्दल उत्सुक असाल, पृथ्वी, चंद्र, सूर्य यांच्यासंबंधी येणारी नवनवी माहिती जाणून घेण्यात तुम्हाला विशेष रस असेल, तर ही माहिती खास तुमच्यासाठीच आहे. त्याचबरोबर अवकाश आणि अंतराळाबद्दल विशेष आवड असलेल्या व्यक्तीलाही ही माहिती वाचून विशेष वाटल्याशिवाय राहणार नाही. 

नासाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी सांगितले की, यूएस पोस्टल सर्व्हिसेसने नुकतेच सूर्याचे काही सुंदर फोटो असलेले पोस्टाचे तिकीट प्रसारित केले आहेत. या तिकिटांवर सूर्यावर दिसणाऱ्या विविध घडामोडी दिसतात. नासाने या घडामोडी समोर आणताना एक gif देखील पोस्ट केला आहे. 

नासाने पोस्ट केलेल्या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे, "१८ जूनला प्रसारित करण्यात आलेल्या तिकीटांमध्ये नासाच्या सोलर डायनेमिक्स ऑब्झर्वेट्रीच्या अंतराळयानामधून दिसणारी सूर्याची दृश्ये दिसत आहेत. यात सूर्याचे विविध प्रकाशतरंग दिसत आहेत. तसेच सूर्यावर दिसणाऱ्या विविध प्रकारच्या सौर घडामोडी ही तिकिटे जगासमोर आणत आहेत. या घडामोडींमधील काही सोलर फ्लेयर्स आणि कोरोनल मास इन्फेक्शन यांसारख्या घडामोडी असे वातावरण तयार करू शकतात ज्यायोगे पृथ्वीवरील आणि अवकाशातील तंत्रज्ञानावर त्याचा थेट प्रभाव पडू शकतो.

नासाने पोस्ट केलेला फोटो आणि माहिती चांगलीच व्हायरल झाली आहे. लोक हा फोटो बघून या फोटोच्या सुंदरतेचे गुणगान गाताना थकत नाही आहेत. तुम्हाला नासाने शेयर केलेल्या या फोटोबद्दल काय वाटले ते आम्हाला कॉमेंटबॉक्समध्ये नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required