computer

कमेन्टेटर्सची कमाई किती असते? त्यांना एका सिरीजचे किती पैसे मिळतात?

बीसीसीआयने नुकतेच खेळाडूंना मिळत असलेल्या मानधनाबद्दल घोषणा केली. खेळाडूंसोबत अजून एक वर्ग असतो ज्यांच्याशिवाय क्रिकेट अपूर्ण असते. हा वर्ग म्हणजे कमेन्टेटर्स. कमेन्टेटर्स शिवाय क्रिकेट पाहणे म्हणजे विना मिठाचे जेवण्यासारखेच झाले. निवृत्त झाल्यावर खेळाडूंसाठी हक्काच्या कमाईची जी साधनं आहेत त्यात कमेंट्री देखील येते. पण सगळेच खेळाडू काही चांगले कमेन्टेटर्स होऊ शकत नाहीत. सुनील गावस्कर सारखे काही अपवाद मात्र असतात जे खेळ आणि क्रिकेट दोन्ही ठिकाणी चांगली कामगिरी करतात.

तर या कमेन्टेटर्सना कमेंट्री करण्याचे पैसे किती मिळतात याबद्दल आजच्या लेखात आपण माहिती घेणार आहोत. कमेन्टेटर्सना एका सिरीजचे आणि वर्षाला किती पैसे मिळतात याचे आकडे पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.

सुनील गावस्कर -

सुनील गावस्कर ज्या पद्धतीने जगातले महान क्रिकेटपटू आहेत त्याच पद्धतीने जेव्हा कधी सर्वात उत्कृष्ट कमेन्टेटर्सचे नाव घेतले जाईल त्यात देखील त्यांचा क्रमांक नक्कीच वरचा असेल. जगातले ते प्रमुख कमेन्टेटर आहेत. वर्ल्डकप सारख्या सिरजमध्ये देखील त्यांच्या कमेंट्रीला मोठा मान असतो. सुनील गावस्कर यांना एका सिरीजसाठी जवळपास ५६ लाख रुपये मिळतात. वर्षाला त्यांची कमाई ही ६ कोटींच्या घरात असते.

हर्षा भोगले -

हर्षा भोगले आपल्या सफाईदार इंग्लिशसाठी ओळखले जातात. मुख्यतः ते इंग्लिश कमेंट्री करत असतात. एका सिरीजमध्ये कमेंट्री करण्याचे त्यांना ३२ लाख रुपये मिळतात. वर्षाला ते साधारणपणे ५-६ कोटी कमवतात.

संजय मांजरेकर -

क्रिकेटमध्ये विशेष छाप न पाडणारे संजय मांजरेकर यांचा मात्र कमेंट्रीत चांगला जम बसला आहे. इंग्रजी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये ते चांगली कमेंट्री करतात. एका सिरीजसाठी त्यांना ४२ लाख रुपये मिळतात. अशाप्रकारे वर्षाला ते ५ कोटींपेक्षा जास्त कमाई करतात.

अनिल कुंबळे -

जगातला सर्वात उत्कृष्ट बॉलर म्हणून प्रसिद्ध असलेले जम्बो अनिल कुंबळे भारताचे प्रशिक्षक देखील होते. सध्या ते कमेंट्रीमध्ये हात आजमावत आहेत. त्यांना देखील एका सिरीजचे ३२ लाख रुपये मिळतात. वर्षाला त्याची कमाई ही ४ कोटीच्या जवळपास असते.

आकाश चोप्रा -

संजय मांजरेकर प्रमाणे आकाश चोप्राची क्रिकेटमधील कामगिरी यथातथाच होती. पण कमेंट्रीत मात्र आकाश चोप्रा स्थिर झाला आहे. अनेकवेळा वेगवेगळी वक्तव्य करून तो चर्चेत असतो. त्याला एका सिरीजचे ३० लाख रुपये मिळतात. वर्षाला त्याची कमाई ही ४ कोटी असते.

व्ही व्ही एस लक्ष्मण -

लक्ष्मण जोवर क्रिकेट खेळत होता तोवर सर्वांचा आवडता होता. कमेंट्रीत देखील त्याने आपली लोकप्रियता टिकवून ठेवली आहे. लक्ष्मणला एका सामन्याचे ३.५ लाख रुपये मिळतात. त्याची देखील कमाई ३-४ कोटी एवढी आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required