क्रिकेटचा काळा दिवस!! लॉर्ड्स मैदानावर स्पॉट फिक्सिंग करणारे पाकिस्तानी क्रिकेटपटू सध्या काय करताय??
क्रिकेट हा 'जंटलमेन्स गेम' म्हणून ओळखला जातो. मात्र हा खेळ खेळताना खेळाडू अशी काही चूक करतात जी वर्षानुवर्षे भरून काढता येत नाही. अशीच काहीशी चूक १२ वर्षांपूर्वी पाकिस्तान संघातील खेळाडूंनी केली होती. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर घडलेल्या घटनेमुळे मोहम्मद आमिर,सलमान बट आणि मोहम्मद आसिफला तुरुंगात जाण्याची वेळी आली होती. ऑगस्ट २०१० मध्ये खेळल्या गेलेल्या लॉर्ड्स कसोटीत या तिन्ही क्रिकेटपटूंनी सट्टेबाज मजहर माजिदसह स्पॉट फिक्सिंगचे काळे कृत्य केले होते.
स्पॉट फिक्सिंग प्रकरण समोर आल्यानंतर तीनही खेळाडूंवर कठोर कारवाई करण्यात आली होती. यात पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बटला सर्वाधिक अडीच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. तर मोहम्मद आसिफला १ वर्ष आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला ६ महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
मात्र आता तीनही क्रिकेटपटूंनी आपली शिक्षा पूर्ण केली असून तिघेही तुरुंगाच्या बाहेर आहेत. स्पॉट फिक्सिंग केल्यानंतर तीनही खेळाडूंच्या क्रिकेट खेळण्यावर बंदी घालण्यात आली होती. मात्र २०१५ मध्ये ही बंदी हटवण्यात घेण्यात आली होती. आता क्रिकेटपासून दूर असलेले हे तीनही क्रिकेटपटू सध्या काय करताय? अनेकांना हे जाणून घ्यायचे असेल. चला तर पाहूया.
या तीनही खेळाडूंवरील बंदी हटवल्यानंतर केवळ मोहम्मद आमिरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यात यश आले होते. सध्या तो इंग्लंडमध्ये राहतो. तो वेस्टइंडिजमध्ये होणारी सीपीएल आणि इंग्लंड काउंटी स्पर्धा खेळतो.
मोहम्मद आमिर प्रमाणेच सलमान बट देखील इंग्लंडमध्येच राहतो. त्याने देखील लीग स्पर्धांमध्ये पुनरागमन केले होते. मात्र सध्या तो माध्यमांवर झळकताना दिसतो. अनेकदा तो क्रिकेटमधील चालू घडामोडींवर आपली प्रतिक्रीया देत असताना दिसून येत असतो.




