computer

युरो चषक २०२१ चे टॉप १६ संघ सज्ज झाले आहेत...संपूर्ण शेड्युल जाणून घ्या!!

युरो चषक २०२१ चा शेवटचा टप्पा जवळ येऊ घातला आहे. मोठ्या दिमाखात २४ संघ या स्पर्धेत उतरले होते. पण त्यातले संघ बाहेर पडत आता १६ संघ उरले आहेत. या १६ पैकी कोण विजेतेपदाला गवसणी घालेल ते येयुरो चषक २०२१त्या काळात कळेलच तत्पूर्वी आपण या स्पर्धेच्या पुढील सामन्यांबद्दल जाणून घेऊया...

१) वेल्स विरुद्ध डेन्मार्क, २६ जून: ९.३०PM

आज रात्री ठीक ९.३० वाजेला या सामन्याचे धुमशान उडणार आहे. अमस्टरडॅम येथील मैदानावर वेल्स आणि डेन्मार्क हे संघ पहिल्यांदाच आमनेसामने भिडणार आहेत. डेन्मार्कने आपले पहिले दोन्ही सामने गमावून पण नॉकआऊट स्टेजमध्ये सर्वात आधी धडक मारली होती. तर वेल्सने ग्रुप ए मध्ये इटली पाठोपाठ रनर अपची जागा पटकावली होती. या सामन्यात विजेता होणारा संघ ३ जुलैला क्वार्टरफायनलमध्ये नेदरलँड किंवा झेक रिपब्लिक सोबत खेळणार आहे.

२) इटली विरुद्ध ऑस्ट्रीया, २७ जून- १२.३०AM

इटलीची कामगिरी या स्पर्धेत चांगली राहिली आहे. ग्रुप स्टेजमध्ये सर्वाधिक पॉईंट्स मिळवत इटलीची टीम ऑस्ट्रियाला हरविण्यासाठी सज्ज झाली आहे. दुसरीकडे ऑस्ट्रीयाने पहिल्यांदाच नॉकआऊटपर्यंत धडक मारल्याने आत्मविश्वासात आहे. आपल्या ग्रुपमध्ये पहिल्या स्थानी असलेली इटली आणि ग्रुप सीमध्ये दुसऱ्या स्थानावरील ऑस्ट्रिया यांच्यापैकी कोण बाजी मारते यावर २ जुलैला म्युनिच येथे कोण क्वार्टर फायनल खेळेल हे ठरणार आहे.

३) नेदरलँड विरुद्ध झेक रिपब्लिक २७ जून ९.३० PM

२००४ साली झालेल्या युरो चषकात या दोन्ही संघांमध्ये झालेला सामना फुटबॉलप्रेमींना आठवत असेल. आता पुन्हा नॉकआऊट स्टेजमध्ये ते पहिल्यांदा समोरासमोर भिडणार आहेत. नेदरलँड हा संघ ३ गोल्स करत सर्वाधिक स्कोर करणारा संघ ठरला, तर झेकने पण आपल्या ग्रुपमध्ये तिसरा क्रमांक मिळवत नॉकआऊट स्टेजपर्यंत मजल मारली आहे. आता यापैकी जो संघ विजेता ठरेल तो ३ जुलैला वेल्स किंवा डेन्मार्क बरोबर क्वार्टरफायनल खेळेल.

4) बेल्जियम विरुद्ध पोर्तुगाल, २८ जुन, १२.३० AM

रेड डेविल्स म्हणून ओळखला जाणारा बेल्जियमचा संघ आणि रोनाल्डोचा पोर्तुगाल यांच्यात ही लढत होईल. दोन्ही तुल्यबळ संघामध्ये कोण बाजी मारेल याचा अंदाज आताच लावणे तसे कठीण आहे. बेल्जियमने फिनलँडविरुद्ध २-० असा एकतर्फी विजय मिळवत आपला मार्ग मोकळा केला होता.

5) क्रोयेशिया विरुद्ध स्पेन, 28 जून 9.30 PM

क्रोयेशिया आणि स्पेन हे पहिल्यांदाच नॉकआऊटमध्ये समोरासमोर येत आहेत. दोन्ही संघांनी आपापल्या ग्रुपमध्ये चांगली कामगिरी केली आहे. क्रोअशिया ग्रुप डी मध्ये दुसऱ्या स्थानी होती, तर स्पेनने स्लोवाकियाला विक्रमी ५-० फरकाने हरवले होते. या सामन्यातील विजयी संघ फ्रान्स किंवा स्वित्झर्लंडसोबत २ जुलैला भिडणार आहे.

6) फ्रांस विरुद्ध स्वित्झर्लंड, २९ जून- १२.३०AM

स्वित्झर्लंडचा संघ ४ गुण मिळवत ग्रुप ए मध्ये तिसऱ्या स्थानी होता, तर फ्रांस मात्र ग्रुप एफ मध्ये पहिल्या स्थानी होता. या दोघांचा सामना रंजक ठरू शकतो.

७) इंग्लंड विरुद्ध जर्मनी, २९ जून - ९.३० PM

युरो १९९६च्या सेमी फायनलमध्ये हे दोन्ही संघ भिडले होते, पण त्यावेळी जर्मनीने बाजी मारली होती. आता मागील पराभवाचा वचपा इंग्लंड काढेल का यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. 

8) स्वीडन विरुद्ध युक्रेन, जून ३० - १२.३० AM

दोन्ही संघ एकमेकाना हरवून क्वार्टर फायनलमध्ये धडक मारण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतील. याआधी पोलंड विरुद्ध ३- २ असा विजय मिळवत स्वीडनने आपले अंतिम १६ मधले स्थान पक्के केले आहे, तर युक्रेनने पण ग्रुप स्टेजमध्ये चांगली कामगिरी केली आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required