"खेळवायचंच नव्हतं तर घेतलं तरी कशाला??" अर्जुन तेंडुलकरला संधी न दिल्याने चाहते भडकले..

आयपीएल २०२२ (Ipl 2022)  स्पर्धेत मुंबई इंडियन्स (Mumbai indians) संघाचा शेवटचा सामना दिल्ली कॅपिटल्स (Delhi capitals) संघाविरुद्ध पार पडला. या सामन्यापूर्वी क्रिकेट चाहत्यांना असे वाटत होते की, अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) आयपीएल स्पर्धेत पदार्पण करण्याची  संधी मिळेल. नाणेफेक होण्यापूर्वी अर्जुन तेंडुलकरचे हावभाव पाहता असे वाटत होते की, आज रोहित शर्मा त्याला प्लेइंग ईलेव्हेनमध्ये संधी देणार. परंतु नाणेफेक झाले आणि त्यानंतर जेव्हा प्लेइंग ईलेव्हेनची घोषणा करण्यात आली, त्यावेळी अर्जुन तेंडुलकरचे नाव त्या यादीत नव्हते. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

सलग २ वर्ष आयपीएल खेळत असलेल्या अर्जुन तेंडुलकरला या हंगामात देखील एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाहीये. त्यामुळे चाहते भलतेच निराश झाले आहेत. तसं पाहिलं तर, मुंबईच्या ताफ्यातील सर्व खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी मिळाली, परंतु अर्जुन तेंडूलकरला एकही संधी मिळाली नाही. याच कारणास्तव मुंबई इंडियन्स संघाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते.

 

एका चाहत्याने ट्विट करत लिहिले की, "मुंबई इंडियन्स संघ अर्जुन तेंडुलकरची कारकीर्द संपुष्टात आणत आहे..." तर दुसऱ्या एका युजरने ट्विट करत लिहिले की, "आजच्या सामन्यातही अर्जुन तेंडुलकरला संधी नाही... दोन वर्षात एकही संधी नाही.. एका युवा खेळाडू बाबत हा चुकीचा निर्णय आहे... खरचं ही एक चुकीची युक्ती आणि चुकीचा निर्णय आहे.." तसेच आणखी एका युजरने ट्विट करत लिहिले की, "अर्जुन तेंडुलकरला संघात घेतलंच का होतं? बाहेर बसवायला.." अशा अनेक प्रतिक्रीया येत आहेत.

काय वाटतं मंडळी? अर्जुन तेंडूलकरला या हंगामात पदार्पण करण्याची संधी द्यायला हवी होती का? कमेंट करून नक्की कळवा..

सबस्क्राईब करा

* indicates required