"कोण शोएब अख्तर, उमरान मलिक? भुवीने टाकलाय वेगवान चेंडू..२०८ किमीचा चेंडू टाकल्यानंतर चाहत्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रीया...

भारत आणि आयर्लंड (India vs Ireland) या दोन्ही संघांमध्ये दोन टी -२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पाहिला टी -२० सामना रविवारी (२६ जून) पार पडला. या सामन्यात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ मैदानात उतरला होता. तसेच उमरान मलिक (umran malik) या युवा वेगवान गोलंदाजाला खेळण्याची संधी देण्यात आली होती. आयपीएल स्पर्धेत वेगवान चेंडू टाकणारा हा गोलंदाज आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आगीचे गोळे फेकणार अशी अपेक्षा व्यक्त केली गेली होती. मात्र असे काहीच झाले नाही. दरम्यान स्विंग गोलंदाजी करणाऱ्या भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) आतापर्यंतचा सर्वात वेगवान चेंडू टाकून सर्वांनाच आश्चर्यचकित केले. ज्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. दरम्यान चाहत्यांनी देखील भन्नाट प्रतिक्रीया दिल्या आहेत.

भुवनेश्वर कुमारबद्दल बोलायचं झालं तर, आपल्या स्विंग गोलंदाजीने त्याने अनेक फलंदाजांची दांडी गुल केली आहे. मात्र आयर्लंडविरुद्ध झालेल्या पहिल्याच सामन्यात त्याच्या वेगवान गोलंदाजीचा उत्तम नमुना पाहायला मिळाला. पहिलाच चेंडू त्याने ताशी २०८ किमी वेगाने टाकला. आश्चर्यचकित झालात का? असं काहीतरी चित्र पहिल्याच सामन्यात पाहायला मिळालं. 

तर झाले असे की, पहिल्या सामन्यात गोलंदाजीला येताच भुवनेश्वर कुमार गोलंदाजी करण्यासाठी आला होता. पहिला चेंडू टाकताच स्पिडोमीटरने चेंडूची गती ताशी २०१ किमी इतकी दाखवली. तर दुसऱ्या चेंडूची गती विश्र्वविक्रमी ताशी २०८ किमी इतकी दाखवली. ही स्पिडोमीटरची चूक होती. मात्र सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे.

सोशल मीडियावर चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रीया..

भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीचा फोटो व्हायरल होताच, नेटकरी सक्रिय झाले आहेत. एका युजरने ट्विट करत लिहिले की, "विश्वविक्रम मोडला... भुवीने स्वतःचाच विश्वविक्रम मोडून काढला. हे अविश्वसनीय आहे.." तर दुसऱ्या एका युजरने ट्विट करत लिहिले की, "कोण शोएब अख्तर, उमरान मलिक? भुवीने टाकलाय आतापर्यंतचा सर्वात वेगवान चेंडू.." भुवनेश्वर कुमारने या सामन्यात ३ षटक गोलंदाजी केली ज्यात त्याने १६ धावा खर्च करत १ गडी बाद केला.

सबस्क्राईब करा

* indicates required