राहुल द्रविड नव्हे तर आशिष नेहरा ठरू शकतो सर्वोत्तम मुख्य प्रशिक्षक,वाचा नेहराच्या प्रशिक्षणातील ४ खास गोष्टी..

आशिया चषक २०२२ स्पर्धेनंतर आता आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत देखील भारतीय संघाला हवी तशी कामगिरी करता आली नाहीये. त्यामुळे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मावर टीकेचा वर्षाव केला जातोय. इतकेच नव्हे तर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आता राहुल द्रविडला मुख्य प्रशिक्षक पदावरून काढून टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान याबाबत बोलताना, माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग याने भविष्यात ही भूमिका कोण योग्यप्रकारे पार पाडू शकतो याबाबत वक्तव्य केले आहे. 

हरभजन सिंगने आशिष नेहराचे नाव सुचवले आहे. याचे कारण असे की ,मुख्य प्रशिक्षक म्हणून आशिष नेहराने गुजरात टायटन्स संघाला आयपीएलच्या पहिल्याच हंगामात जेतेपद मिळवून दिले होते. आता प्रश्न असा उपस्थित होतो की, आशिष नेहरा मुख्य प्रशिक्षक पदासाठी योग्य आहे का? या लेखातून आम्ही तुम्हाला आशिष नेहराच्या प्रशिक्षणातील ४ खास गोष्टी सांगणार आहोत, ज्यावरून तो या पदासाठी योग्य असल्याचे दिसून येते. चला तर पाहूया.

) टी-२० क्रिकेट खेळण्याचा दांडगा अनुभव.. 

आशिष नेहरा बरेच वर्ष भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच काही वर्षांपूर्वीच त्याने आंतराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले आहे.आशिष नेहराने ती-२० क्रिकेटमध्ये जोरदार कामगिरी केली आहे. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीत ८८ तर टी-२० आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने एकूण २७ सामने खेळले आहेत. 

)संघ व्यवस्थापन करण्यात तज्ञ.. 

आशिष नेहराची खासियत म्हणजे तो संघ व्यवस्थापन करण्यात तज्ञ आहे. त्याचा स्वभाव हा मनमिळावू आहे. त्यामुळे खेळाडू देखील त्याच्यासोबत मोकळ्या मनाने बोलू शकतात. गुजरात टायटन्स संघासोबत काम करत असताना देखील त्याने हेच केले. संघात स्टार खेळाडू नसताना त्याने साई किशोर, वेड आणि राहुल तेवतीया सारख्या खेळाडूंना संधी दिली. शेवटी याच खेळाडूंनी संघाला जेतेपद मिळवून दिले.

) आकडेवारीला करतो दुर्लक्ष... 

आशिष नेहराची आणखी एक खासियत म्हणजे तो आकडेवारीला दुर्लक्ष करतो. त्याचे म्हणणे स्पष्ट आहे की, जर खेळाडू चांगला असेल तर, तो कुठल्याही परिस्थितीत संघासाठी चांगली कामगिरी करू शकतो. 

) हार्दिक पंड्या सोबत चांगली मैत्री... 

असे म्हटले जात आहे की, आगामी २०२४ टी-२० विश्वचषक स्पर्धेत हार्दिक पंड्या भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसून येऊ शकतो. त्यामुळे रोहित शर्माच्या अनुपस्थित हार्दिक पंड्याला नेतृत्वाची जबाबदारी दिली जात आहे. नुकताच त्याने न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. जर हार्दिक पंड्या यापुढेही संघाचे नेतृत्व करत असेल तर, आशिष नेहरा आणि हार्दिक पंड्या यांची जोडी चांगलीच जमेल. 

सध्या राहुल द्रविड भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत, मात्र आशिष नेहराला भविष्यात ही संधी मिळाली तर, तो देखील ही भूमिका योग्यरीत्या पार पाडू शकतो.

सबस्क्राईब करा

* indicates required