Cricket Facts: क्रिकेट इतिहासातील ३ धक्कादायक घटना! वाचून विश्वास बसणार नाही...

भारतात क्रिकेट हा सर्वात लोकप्रिय खेळ आहे. या खेळात अनेक असे विक्रम बनवले जातात तसेच विक्रम मोडले देखील जातात. आतापर्यंत सर्वाधिक धावा करण्याचे तसेच सर्वाधिक गडी बाद करण्याचे विक्रम बनवण्यात आले आहेत. मात्र आज आम्ही ज्या विक्रमांबद्दल माहिती देणार आहोत, ते जाणून घेतल्यानंतर तुम्हाला आश्चर्य झाल्याशिवाय राहणार आहे. चला तर पाहूया असे काही विक्रम जे तुम्हाला क्वचितच माहीत असतील.

एकाच दिवसात खेळले गेले कसोटी सामन्यातील इनिंग...

कसोटी क्रिकेट हा ५ दिवसांचा खेळ असतो. विरोधी संघाने जोरदार कामगिरी केली तर कसोटी सामन्याचा निकाल २ दिवसात देखील लागतो. मात्र कसोटी क्रिकेटच्या पहिल्याच दिवशी निकाल लागणं ही आश्चर्यकारक बाब आहे. हा पराक्रम २००० साली इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यादरम्यान पाहायला मिळाला होता. या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि वेस्ट इंडिज संघाचा डाव २६७ धावांवर आटोपला. 

त्यानंतर फलंदाजीला आलेल्या इंग्लंड संघाला वेस्ट इंडिज संघाने  १३४ धावांवर ऑल आऊट केले. त्याच दिवशी वेस्ट इंडिज संघाचा दुसरा डाव अवघ्या ५४ धावांवर आटोपला. त्यामुळे इंग्लंड संघाला त्याच दिवशी फलंदाजी करण्यासाठी मैदानावर यावे लागले होते. हा कसोटी सामना याच कारणामुळे ऐतिहासिक ठरला.

१७ चेंडूंचे षटक..

क्रिकेटच्या नियमानुसार ६ चेंडू टाकले की, १ षटक पूर्ण होत असते. मात्र क्रिकेट इतिहासात एकदा अशी घटना घडली होती जेव्हा गोलंदाजाला १ षटक पूर्ण करण्यासाठी १७ चेंडू टाकावे लागले होते. ही घटना २००४ मध्ये बांगलादेश विरुध्द पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात घडली होती. या वनडे सामन्यातील एका षटकात मोहम्मद सामीने १ षटक पूर्ण करण्यासाठी तब्बल १७ चेंडू फेकले होते. या षटकात त्याने ४ नो बॉल आणि ७ वाईड चेंडू टाकले होते. यादरम्यान त्याने २२ धावा खर्च केल्या होत्या.

राहुल द्रविडने मारले आहेत सलग षटकार..

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि वर्तमान भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आपल्या डिफेंसीव फलंदाजीसाठी ओळखला जायचा. मात्र अनेकांना ही बाब माहीत नसेल की, राहुल द्रविडने फलंदाजी करताना सलग ३ षटकार मारण्याचा पराक्रम देखील केला आहे. त्याने २०११ मध्ये इंग्लंड विरुध्द झालेल्या टी -२० सामन्यात सलग ३ षटकार मारले होते. 

कसोटी क्रिकेटमध्ये एकाच डावात १० गडी बाद करणारा भारतीय गोलंदाज कोण आहे? कमेंट करून नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required