राहुल द्रविड चक्क स्कॉटलंडसाठी क्रिकेट खेळलाय? किती सामने खेळला आहे ते ही एकदा पाहून घ्या!

वयाची २० वर्ष पूर्ण केलेल्यांचा बालपणीचा हिरो म्हणजे द वॉल-राहुल द्रविड!! आपल्या शांत आणि संयमी स्वभावाने त्याने प्रत्येक भारतीयाचे मन आजवर जिंकले आहे. भारतासाठी अनेक सामने खेळून अनेक विक्रमही त्याने केले. मात्र तो भारताव्यतिरिक्त पण अजून एका देशासाठी खेळला आहे हे मात्र अनेकांना माहीत नसते.

स्कॉटलँड हा तो देश आहे, ज्यांच्यासाठी राहुल द्रविडने क्रिकेट खेळले आहे. एक दोन नव्हे, तर ११ सामने तो या देशासाठी खेळला आहे. ही गोष्ट २००३ सालातली आहे. द्रविडच्या स्कॉटलँड मुक्कामासाठी तेथील एनआरआय पुढे आले होते. त्यांनी काही कार्यक्रमांच्या माध्यमातून हा निधी गोळा केला होता.

पहिल्या सामन्यात तर द्रविडने २५ धावा केल्या होत्या. पण नंतर मात्र त्याने आपल्या नेहमीच्या खास खेळाचे प्रदर्शन केले होते. यात त्याने २ शतकं आणि ८ अर्धशतकं लगावत ६६६ धावा केल्या होत्या. पण एवढे सगळे करूनही स्कॉटलँड मात्र एकही सामना जिंकू शकले नव्हते.

आता द्रविड एक खेळाडू म्हणून तर महान आहेच, एक मार्गदर्शक म्हणूनही तो जबरदस्त आहे हे भारतात सर्व जाणतात. पण स्कॉटलँड संघात त्याच्या सोबत खेळलेला १९ वर्षीय खेळाडू कायली कोईझर सध्या स्कॉटलँडचा प्रमुख खेळाडू असून तो विकेटकिपर आहे. नुकत्याच झालेल्या वर्ल्डकप मध्ये पण तो खेळला होता.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required