असा धावतो घोडा !!

Subscribe to Bobhata

आपली साधी भोळी मराठी मने घोड्यांच्या शर्यतीला फारच घाबरतात. आपल्या माणसांनी त्याला 'शर्यतीचा नाद ' असे नाव देउन विचार करण्याचे पण टाळले आहे.

घोड्यांच्या शर्यतीबद्दल गैरसमज नाहीसे करावे हा या लेख मालिकेचा एकमेव उद्देश आहे. तर सुरुवात करू या उद्या पुण्यात होणार्‍या सेंट लेजर ट्रीपल क्राऊन (लास्ट लेग) या शर्यतीपासून !!!! ही शर्यत म्हणजे तिसरी आणि शेवटची म्हणून लास्ट लेग असे म्हणतात.

घोड्यांचीही दमछाक व्हावी अशी ही शर्यत आहे कारण गिनेस मध्ये  १६०० मीटर तर डर्बी मध्ये २४०० मीटर धावणार्‍या घोड्यांना या रेस मध्ये २८०० मीटर धावून जिंकायचे असते.साहजिकच तगडा दमदार घोडाच या शर्यतीत जिंकतो. गिनेस ,डर्बी आणि सेंट लेजर या तिन्ही शर्यतीत जिंकणारा घोडा ट्रीपल क्राउनचा मानकरी होतो.

अर्थात हे फारच क्वचित घडते . १९७८ ते २०१५ या सदतीस वर्षाच्या काळात एकदाच असे झाले.आंतरराष्ट्रीय मानाची रेस असल्याने देशोदेशीचे जॉकी (स्वार) या रेससाठी खास निमंत्रीत केले जातात.  या वर्षी डर्बी जिंकणारा डेजर्ट गॉड हा घोडा उद्याच्या रेस मध्ये धावणार आहे .

रवि गोवंडे
 

सबस्क्राईब करा

* indicates required