असा असतो आयपीएल खेळाडू आणि बीसीसीआयमधला करार...

मंडळी, सध्या आयपीएल सीझन मोठ्या धूमधडाक्यात सुरु आहे. आयपीएलचं हे अकरावं वर्ष! आता आयपीएलचे लिलाव आणि  सामने आपल्या जाम अंगवळणी पडलेयत. कुणाला करोडो रुपयांत खरेदी केलं जातं, तर कुणाला लिलावाचे दोन राऊंड झाले तरी कुणी विकत घेत नाही.  जेमतेम ४५ दिवस चालणाऱ्या या सामन्यांसाठी कमीत कमी जेवढे लाख मिळतात, तेवढा तर आपल्याला वर्षाचा पगार पण नसतो राव !!

तर तुम्हांला प्रश्न असेल की एकेकाला इतके करोड आणि लाख लिलावात जाहीर होतात, ते सगळे त्यांना मिळतात का ? तर, नेमक्या याच प्रश्नाचं उत्तर आज आम्ही घेऊन आलोय.. आम्ही सांगत आहोत, आयपीएलच्या लिलावाचा खेळाडू, बीसीसीआय आणि विकत घेणाऱ्या टीम म्हणजेच फ्रँचाईसीमध्ये नक्की कशा प्रकारचा करार असतो.

स्रोत

आयपीएलमध्ये खेळाडूंच्या बऱ्याच वेगवेगळ्या याद्या असतात. म्हणजे बघा- ऑल राऊंडर खेळाडू, बोलर्स, विकेट कीपर, अनकॅपड प्लेयर्स, अंडर -२२, अंडर-१९ वगैरे वगैरे. लिलाव सुरु होताना यातल्या प्रत्येक खेळाडूची एक बेस प्राईस जिला आपण किमान किंमत म्हणू शकतो, ती ठरवलेली असते. या किमान किंमतीपण प्रत्येक खेळाडूसाठी वेगवेगळ्या असतात. म्हणजेच, ख्रिस गेलची बेस प्राईस आणि अजिंक्य रहाणेची बेस प्राईस सारखी नसू शकते.

स्रोत

आयपीएलच्या नियमाप्रमाणं, प्रत्येक खेळाडूला बीसीसीआयसोबत करार करावा लागतो. हा करार दोन प्रकारचा असू शकतो. पहिला प्रकार- त्याला फर्म ॲग्रीमेंट म्हटलं जातं-त्यात खेळाडूला लिलावानंतर बीसीसीआयकडून एक ठराविक रक्कम मिळते आणि लिलावातली बोली अन् या ठराविक रकमेतली तफावत रक्कम बीसीसीआयकडे जाते. उदा. एखाद्या खेळाडूनं फर्म ॲग्रीमेंट करार केला असेल आणि त्याची बीसीसीआयसोबतची ठरलेली रक्कम ७० लाख आहे. जर त्याला लिलावात शेवटची बोली १ करोडची मिळाली, तर त्याला बीसीसीआयकडून फक्त ७०लाखच मिळतात आणि वरचे ३० लाख बीसीसीआयला मिळतात.

स्रोत

दुसऱ्या प्रकारच्या करारात-त्याला बेसिक ॲग्रीमेंट म्हटलं जातं-त्यात खेळाडूला लिलावानंतर बोलीत लागलेली सर्व रक्कम मानधन म्हणून मिळते. आणि तुम्ही पाह्यलं असेलच, सरासरी ८० लाखांपर्यंत रक्कम जवळजवळ प्रत्येक खेळाडूला मिळतेच मिळते.

आयपीएलच्या नियमाप्रमाणं, प्रत्येक फ्रँचाईसीला किमान ३३ लाख रुपये खेळाडूंच्या वार्षिक फीसाठी खर्च करावेच लागतात आणि प्रत्येक खेळाडूला दररोज १००डॉलर म्हणजेच ६ ते ७ हजार रुपये रोजचा भत्ता म्हणून द्यावे लागतात.

स्रोत

अंडर -२२ खेळाडूंना किमान २२,००० डॉलर्स म्हणजेच आपल्याकडचे १४ ते १५ लाख रुपये दिले जातात.  इतरांना किमान ५०,०००डॉलर्स म्हणजेच आपल्याकडचे ३१ ते ३२ लाख हजार मिळतात.  मात्र अंडर-१९ आणि रणजी खेळाडूंना दिली जाणारी रक्कम अंडर -२२ खेळाडूंपेक्षा आणखी कमी असते.

आता आयपीएलमध्ये काही भारतीय खेळाडू असतात आणि काही परदेशी. मग समजा, आपल्या आयपीएलच्या मॅचच्या वेळेस दुसरी कुठली मॅच आली तर? मग हे लिलावात घेतलेले खेळाडू नक्की कोणती मॅच खेळणार? हो, याचंही उत्तर त्या करारात आहे बरं..

स्रोत

जर समजा, खेळाडू परदेशी असेल, आणि त्याच्या देशाची दुसऱ्या देशासोबत क्रिकेट मॅच असेल, तर त्याला ताबडतोब सोडण्यात येतं. भारतीय खेळाडू मात्र त्यांना आयपीएल खेळायची आहे, की इंटरनॅशनल मॅच हे स्वत:च ठरवू शकतात. अर्थात, यात बरेच जण आयपीएल खेळणार हे उघड आहे. नुसत्या ४५ दिवसांत लाखो रुपये देणारी सोन्याची कोंबडी कोण सोडेल राव? यामुळं ज्यांना देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळायला मिळालं नसतं, अशा वयानं लहान खेळाडूंना पुढे येण्याचा  चान्स मिळतो, हा दुहेरी फायदा.

काही खेळाडू लिलावात नसतात, त्यांना एखाद्या फ्रँचाईसीनं राखीव म्हणून ठेवलेलं असतं. त्यांना किती करोड किंवा लाख द्यायचे ते खेळाडू आणि त्या फ्रँचाईसीनं ठरवलेलं असतं. पण प्रत्यक्षात त्याला त्याहून जास्त किंवा कमी रक्कम मिळू शकते. म्हणूनच खरोखरीचा दिलेला पगार आणि पर्स डिडक्शनच्या रकमांमध्ये तुम्हांला फरक आढळतो.

स्रोत

लिलावाच्या रकमेखेरीज इतरही बरेच रुपये या खेळाडूंना मिळतात. मॅन ऑफ मॅच, जास्तीत जास्त सिक्स, जास्तीत जास्त कॅचेस, मॅन ऑफ टूर्नामेंट, पर्पल आणि ऑरेंज कॅप... बख्खळ बक्षीसं आणि लै रुपये मिळतात यातूनही. पुन्हा टीम जिंकली, की मिळालेल्या बक्षीसाच्या रकमेच्या ५०% टक्के रक्कम फ्रँचाईसीला त्यांच्या खेळाडूंना द्यावी लागते. आणि ही बक्षीसाची रक्कम काही थोडीथोडकी नसते..

पाह्यलंत...सारा पैशाचा खेळ आहे हा भाऊ!!

सबस्क्राईब करा

* indicates required