वर्ल्डकप २०१९ : आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०१९ चं वेळापत्रक बघून घ्या राव !!

क्रिकेट प्रेमींसाठी एक मोठी बातमी आम्ही आणली आहे राव. २०१९ सालात इंग्लंडमध्ये होणाऱ्या ‘आयसीसी क्रिकेट विश्वकप २०१९’ चे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या आठ संघांनी विश्वचषक स्पर्धेत स्थान निश्चित केलं होतं. वेळापत्रकानुसार ३० मे २०१८ रोजी सामन्यांना सुरुवात होईल तर १४ जुलै रोजी अंतिम सामना रंगेल.

राव, भारताचा पहिला सामना ५ जून रोजी दक्षिण आफ्रिके सोबत होणार आहे तर दुसरा सामना ९ जून रोजी ऑस्ट्रेलिया सोबत होईल. भारतीय क्रिकेटप्रेमी ज्या सामन्याची आतुरतेने वाट बघत असतात तो भारत विरुद्ध पाकिस्तान सामना १६ जून रोजी रंगणार आहे. यासोबतच भारताचे एकूण सामने पुढील प्रमाणे असतील :

5 जून 2019 : दक्षिण आफ्रिका

 9 जून 2019 : ऑस्ट्रेलिया

13 जून 2019 : न्यूझीलंड

16 जून 2019 : पाकिस्तान

22 जून 2019 : अफगाणिस्तान

27 जून 2019 : वेस्ट इंडिज

30 जून 2019: इंग्लंड

2 जुलै 2019 : बांगलादेश

6 जुलै 2019: श्रीलंका

9 जुलै 2019 : उपांत्य फेरी १

11 जुलै 2019 : उपांत्य फेरी २

14 जुलै 2019 : अंतिम फेरी 

 

 

सबस्क्राईब करा

* indicates required