computer

बेन स्टोक्सच्या जर्सीवर भारतीय डॉक्टरचं नाव? कोण आहेत हे डॉक्टर? त्यांचं कार्य काय आहे?

इंग्लंडचा क्रिकेटर बेन स्टोक्सला भारतात सगळेच ओळखतात. त्याचेसुद्धा भारतावर विशेष प्रेम आहे हे वेळोवेळी दिसून येते. यावेळी बेन स्टोक चर्चेत आला आहे तो एका भारतीय डॉक्टरमुळे!!

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज दरम्यान सराव सामना नुकताच पार पडला. या मॅचसाठी इंग्लंड टीमने वेगळी जर्सी घातली होती. कोरोना रोखण्यासाठी जे डॉक्टर पुढे येऊन काम करत आहेत त्यांची नावे त्या जर्सीच्या मागे लिहली होती. आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट अशी की त्यातले एक नाव भारतीय होते. आणि नेमक्या त्याच नावाची जर्सी इंग्लंडचा कार्यवाहक कॅप्टन बेन स्टोक्सने घातली होती. ते नाव म्हणजे डॉ. विकास कुमार!!!

इंग्लंडच्या क्रिकेटर्सकडून या कोरोना योद्ध्यांना सलाम म्हणून त्यांचे नाव लिहिलेली जर्सी घालून ते मैदानात उतरले होते. पाठीवर डॉक्टरचे नाव आणि त्यापुढे #raisethebat असे लिहिलेले होते.

डॉ. विकास हे इंग्लंडच्या डरहम काऊंटीतल्या नॅशनल हेल्थ सर्व्हिस ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. मूळ दिल्लीचे असलेले विकास कुमार हे सुद्धा स्थानिक स्तरावर क्रिकेट खेळलेले आहेत. त्याचप्रमाणे ३ वर्षांपूर्वी फिरोजशहा कोटला मैदानावर झालेल्या भारत- श्रीलंका मॅचवेळी ते डॉक्टर ऑन ड्युटी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. मागच्या वर्षी ते इंग्लंडला कामासाठी शिफ्ट झाले आहेत.

इंग्लंडमधल्या एका एशियन वंशाच्या असलेल्या प्लेयर्सतर्फे चालवल्या जाणाऱ्या क्लबसाठी ते क्रिकेट खेळतात. बेन स्टोकसारखा जागतिक प्रतिभेचा खेळाडू त्यांचे नाव लिहिलेली जर्सी घालतो हे ऐकून त्यांना सुद्धा आनंद झाला आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required