युवराजच्या लग्नाची लईभारी पत्रिका- 'युवराज अॅण्ड हेझल प्रिमियर लीग'

भारताचा स्टार क्रिकेटर युवराज सिंह लवकरच लग्नाच्या बेडीत अडकतोय. मॉडेल आणि अभिनेत्री हेझल कीचसोबत येत्या 30नोव्हेंबरला हे लग्न होणार आहे. आणि सगळीकडे या लग्नाची खुसखुशीत चर्चा सुरू आहे ती त्यांच्या खास वेडिंग कार्डमुळे...

युवराज आणि हेझलला आपलं लग्न अविस्मरणीय बनवायचं आहे. (तशी तर ही इच्छा प्रत्येकाची असते म्हणा.) त्यामुळे त्यांनी आपली लग्नपत्रिका खास”क्रिकेट थीम’वर डिझाईन करून घेतली आहे. या लग्नपत्रिकेचं नाव आहे 'युवराज अॅण्ड हेझल प्रिमियर लीग'. या मजेदार वेडिंग कार्डमध्ये क्रिकेट थीमवर आधारित युवराज आणि हेझलची कार्टून्स तुम्हाला दिसतील. या स्पेशल गोल्ड एंम्बॉसींग केलेल्या लग्नपत्रिकांच डिझाईन सँडी आणि कपिल खुराणा या डिझायनर्सनी केलं आहे. एकंदरीत संपूर्ण लग्नाची थीमच 'क्रिकेट' असल्याने या लग्नसमारंभाचा थाट काही वेगळाच असणार हे नक्की...

३० नोव्हेंबरला चंदिगडमध्ये लग्न झाल्यानंतर २ डिसेंबरला परत एकदा हिंदू पद्धतीनं गोव्यात हे लग्न होणार आहे. आपल्या उत्तुंग षटकारांनी डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या युवराजला बोभाटाकडून तितक्याच उत्तुंग शुभेच्छा !!

सबस्क्राईब करा

* indicates required