आयपीएल २०२२ स्पर्धेच्या प्लेऑफ सामन्यांबद्दल मोठी अपडेट आली समोर

आयपीएल २०२२ स्पर्धा (ipl 2020) स्पर्धा आता दुसऱ्या टप्प्यात पोहोचली आहे. काही दिवसांनंतर या स्पर्धेतील प्लेऑफचे सामने सुरू होणार आहेत. हे सामने सुरू होण्यापूर्वी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी घोषणा केली आहे की, या हंगामातील प्लेऑफचे सामने अहमदाबाद आणि कोलकाता येथे होणार आहेत. तर अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडणार आहे.

बीसीसीआयचे सचिन जय शाह यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, आयपीएल २०२२ स्पर्धेतील प्लेऑफचे सामने कोलकाता आणि अहमदाबादमध्ये रंगणार आहे. तसेच अंतिम सामना २९ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडणार आहे. याच मैदानावर क्वालिफायर २ चा सामना देखील होणार आहे. तसेच क्वालिफायर १ आणि एलिमिनेटरचा सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर पार पडणार आहे.

असे आहे आयपीएल २०२२ स्पर्धेतील प्लेऑफच्या सामन्यांचे वेळापत्रक

२४ मे २०२२- क्वालिफायर १, कोलकाता

२५ मे २०२२- एलिमिनेटर, कोलकाता

२७ मे २०२२- क्वालिफायर २, अहमदाबाद

२९ मे २०२२- अंतिम सामना, अहमदाबाद

यासह जय शाह यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. वुमेन्स टी२० चॅलेंज स्पर्धा देखील लवकरच सुरू होणार आहे. ही स्पर्धा पुणे येथे पार पडणार आहे. यापूर्वी ही स्पर्धा लखनऊ येथे पार पडणार होती. ही स्पर्धा २३ ते २६ मे पर्यंत सुरू राहील. तर स्पर्धेचा अंतिम सामना २८ मे रोजी पार पडणार आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required