computer

किदंबी श्रीकांत वर्ल्ड चॅम्पियनशिप हरला असला तरी त्याचं तिथपर्यंत पोचणं भारतासाठी महत्त्वाचं का ठरलं आहे?

'हारकर जितने वाले को बाजीगर कहते है' हा डायलॉग प्रसिद्ध आहे. सध्या स्पेन येथे सुरू असलेल्या बीडब्लूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचा बॅडमिंटन खेळाडू किदंबी श्रीकांत याला हाच डायलॉग लागू होतो. या स्पर्धेच्या फायनलमध्ये आजवर एकही भारतीय पोहोचला नव्हता. श्रीकांत फायनलमध्ये हरूनही त्याने विक्रम केला आहे.

या स्पर्धेत रौप्यपदक जिंकत श्रीकांतने इतिहास घडवला आहे. बीडब्लूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. या स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचल्यावर श्रीकांतवर बॅडमिंटन प्रेमींच्या नजरा खिळल्या होत्या. फायनलमध्ये श्रीकांत समोर लोह कीन येव या सिंगापूरच्या खेळाडूचे आव्हान होते.

 

येवसोबत झालेल्या या सामन्यात श्रीकांतचा २१-१५, २२-२० अशा फरकाने पराभव झाला आहे. १६ मिनिटे चाललेल्या या सामन्यात सुरुवातीला श्रीकांतने ९-७ अशी लीड घेतली होती. पण नंतर येवने धमाकेदार खेळ दाखवत श्रीकांतला पुनरागमन करण्याची संधी मिळू दिली नाही.

 

या स्पर्धेत पदक जिंकणारा श्रीकांत चौथा भारतीय खेळाडू आहे. १९८३ साली दीपिका पदुकोणचे वडील प्रकाश पदुकोण यांनी, तर २०१९ साली बी. साईप्रणित यांनी कांस्यपदक जिंकले होते. तर याच वर्षी लक्ष्य सेन याला कांस्यपदक मिळाले आहे.

श्रीकांतचे वय २८ आहे. या स्पर्धेत फायनलमध्ये जाऊन त्याचा पराभव झाला असला तरी भविष्यात त्याच्याकडून खेळ उंचावण्याची अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे. लवकरच सुवर्णपदकाचे भारतीय स्वप्न पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करूया.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required