computer

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर पुन्हा एकदा चर्चेत...यावेळचं कारण काय?

ऑस्ट्रेलियन क्रिकेट सातत्याने चर्चेत असते. आता पुन्हा ऑस्ट्रेलियाचा एक खेळाडू चर्चेत आला आहे. पण यावेळी चर्चेचे कारण क्रिकेट नाही तर वेगळेच आहे. २००३-०४ च्या दरम्यान ऑस्ट्रेलियासाठी खेळणारा खेळाडू स्टुअर्ट मॅकगिल याचे गेल्या महिन्यात अपहरण करण्यात आले होते. विषेश म्हणजे त्याला एकाच तासात सोडून देण्यात आले.

काय आहे हे प्रकरण?

असं म्हणतात की सिडनीच्या उत्तर भागात एका व्यक्तीने मॅकगिलला थांबविले. नंतर आणखी दोन लोकांनी येउन त्याला बळजबरीने त्याला गाडीत बसवले. या कारस्थानामागे आपली गर्लफ्रेंड मारियाचा भाऊ मॅरीनो सोतिरोपोलोस असल्याचा आरोप मॅकगीलने केला आहे.

हा मॅरीनो न्यूट्रल बे येथील अॅरिस्टॉटल रेस्टॉरंटचा मालक असून त्याच ठिकाणी मॅकगिल मॅनेजर म्हणून काम करत असे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मॅकगिलला आधी मारहाण करण्यात आली आणि मग धमकावून मग सोडण्यात आले होते.

या घटनेत सामील असलेल्या मॅरीनो सोबतसहित इतर लोकांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर अपहरण, मारहाण केल्याचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यात महत्वाची गोष्ट अशी की ही घटना घडून गेल्याच्या ६ दिवसांनी पोलिसांना ही गोष्ट माहीत झाली. मॅकगिल याने या घटनेचा मोठा धसका घेतला होता. त्याला स्वतःच्या सुरक्षिततेची मोठी चिंता वाटू लागली होती.

आता एक प्रश्न पडतोच की मॅरीनोने मॅकगिलचे अपहरण का केले असावे? प्राथमिक तपासात असे आढळले आहे की मॅरीनोला मॅकगिलला धमकावून त्याच्याकडून पैसे उकळायचे होते. पण हे काही शक्य झालेलं दिसत नाही.

आता थोडं मॅकगिल विषयी. मॅकगिलने ऑस्ट्रेलियासाठी ४४ कसोटी आणि ३ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याने १९९८ साली लेग स्पिनर म्हणून पदार्पण केले होते. पुढे २००८ साली त्याने निवृत्ती पत्करली. मॅकगिल बिग बॅश लीग आणि बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये देखील खेळला आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required