computer

२०१९चा कोहलीचा 'पेप्सी स्वॅग प्लेयर ऑफ द मॅच' व्हिडिओ पुन्हा व्हायरल होतोय. का? पाहा तर कळेलच!!

विराट कोहलीने भारतीय संघाचा राजीनामा दिल्यावर त्याच्या चाहत्यांमध्ये निराशा होती. पण आयपीएलमध्ये कोहलीचा संघ बँगलोर यंदा चांगली कामगिरी करत असल्याने चाहते आनंदी आहेत. त्यातच कोहलीचा भन्नाट अंदाज दाखवणारा एक जुना विडिओ पुन्हा वायरल झाला आहे.

२०१९ साली भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान ईडन गार्डनवर झालेल्या पहिल्या पिंक बॉल सामन्यानंतरचा हा व्हिडीओ आहे. या सामन्यात भारताने विराट कोहलीच्या १३६ धावांच्या जीवावर भारताने एक इनिंग राखत बांगलादेशला धूळ चारली होती. पहिल्याच पिंक बॉल सामन्यात मिळालेला हा विजय या अर्थाने तसा ऐतिहासिक होता.

विराट कोहलीने या सामन्यात केलेल्या कामगिरीसाठी त्याला 'पेप्सी स्वॅग प्लेयर ऑफ द मॅच' हा पुरस्कार मिळाला होता. कोहलीला हा पुरस्कार देतानाचा हा वायरल व्हिडिओ आहे. कोहली पुरस्कार घ्यायला जातो तेव्हा समोरचा व्यक्ती त्याला शेकहँड करतो. शेकहँड करून झाल्यावर जेव्हा कोहली पुरस्कारासाठी हात पुढे करतो तेव्हा त्याचे लक्ष नसते. मग कोहली पुन्हा पुरस्कार मागून घेतो.

ही घटना घडल्यावर कोहली समोर बघून मिश्किल हास्य करतो आणि त्या व्यक्तीसारखी ऍक्टिंग करून दाखवतो. दोन वर्ष जुना असलेला हा व्हिडीओ पुन्हा एका चाहत्याने ट्विटरवर टाकला आहे. लोकांनी यावर भन्नाट प्रतिक्रिया देत या व्हिडीओचा आनंद घेतला आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required