computer

फुटबॉल चाहत्याने गोलकीपरच्या डोळ्यांवर लेझर लाईट का चमकवला? युरो चषकच्या सेमी फायनल सामन्यात काय घडलं?

खेळ कुठलाही असो, मैदानावर जिंकण्यासाठी खेळाडू उत्तम खेळण्यासोबतच अनेक छक्केपंजेही कारताना दिसतात. क्रिकेटच्या मैदानावर दिसणारा स्लेजिंग हा प्रकार तर सर्वाना माहीत आहे. फुटबॉल मैदानावर पण पाय अडवणे, धक्के देणे असे प्रकार घडत असतात. या सर्व प्रकारात प्रेक्षकांची भूमिका ही फक्त बघण्यापुरतीच असते. मैदानाबाहेर राहून ते काही करू पण शकत नाहीत. मात्र फुटबॉलमधली प्रतिष्ठेची स्पर्धा युरो चषकात एका प्रेक्षकाने केलेला प्रकार पाहून लोकांना धक्का बसला आहे.

बुधवारी वेम्बले स्टेडियमवर डेन्मार्क आणि इंग्लंडदरम्यान सेमी फायनल सामना सुरू होता. त्यावेळी डेन्मार्कचा गोलकीपर kasper schmeichel हा पेनल्टी वाचविण्याच्या तयारीत असताना मैदानावरील प्रेक्षक गॅलरीतून एका प्रेक्षकाने त्याच्या डोळ्यावर लेझर लाईट चमकवला. Kasper तरीही स्पॉट किक रोखण्यात यशस्वी ठरला.

सामना सुरू असताना १०४ व्या मिनिटाला हा प्रकार घडला. इंग्लन्डच्या एका चाहत्याने हा प्रकार केला असल्याचा अंदाज आहे. हिरव्या रंगाच्या लेझर लाईटने kasper च्या खेळात अडथळा आणण्यासाठी त्याच्या उजव्या डोळ्यावर हा फ्लॅश मारण्यात आला. त्या भावाची ही आयडिया मात्र फेल गेली. कारण Kasper पेनल्टी वाचविण्यात यशस्वी ठरला.

या घटनेने लोकांच्या मनात चांगलाच राग निर्माण झाला आहे. हे कृत्य करणारा कोणीही असला तरी त्याला शोधून काढले पाहिजे आणि पुन्हा कधीही त्याला मैदानावर प्रवेश मिळणार नाही अशी काळजी घेतली पाहिजे अशी मागणी होत आहे. या मागणीला काही खेळाडूंनी पण पाठिंबा दिला आहे.

इंग्लंडचा सामना आता फायनलमध्ये इटलीसोबत होणार आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required