computer

आयपीएल २०२१: एका ओव्हर मध्ये जास्तीतजास्त धावा गोळा करणारे ५ खेळाडू...

चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्यात झालेल्या सामन्यात, दोन्ही बाजूने धावांचा डोंगर रचलेला पाहायला मिळाला. चेन्नईने केलेल्या २२० धावांचा पाठलाग करताना कोलकाताने २०२ धावांपर्यंत बाजू ओढली. पण तरी चेन्नईने दिलेले लक्ष कोलकाता पार करू शकली नाही. यात पॅट कमिन्सने केलेल्या धमाकेदार खेळीचे मोठे योगदान होते. ३४ बॉल्सवर त्याने ६६ धावा केल्या. यात सॅम करनच्या एकाच ओव्हरमध्ये त्याने तब्बल ३० धावा कुटल्या. 

यंदाच्या सिझनमधील एका ओव्हरमधील हा सर्वात मोठा स्कोर आहे. याच निमित्ताने आम्ही तुम्हाला आजवर आयपीएलमध्ये एकाच ओव्हरमध्ये कुणी ३० पेक्षा जास्त धावा करणाऱ्या खेळाडूंची माहिती सांगणार आहोत.

१. ख्रिस गेल

ख्रिस गेल षटकारांचा बादशाहा आहे. आयपीएलमध्ये सर्वात जास्त षटकार त्याच्याच नावावर आहेत. त्याने २०११ च्या आयपीएलमध्ये कोची संघाविरुद्ध प्रशांत परमेश्वरनच्या बॉलिंगवर खेळताना थेट ३६ धावा केल्या होत्या. त्याला त्या ओव्हरमध्ये एक बॉल जास्तीचा मिळाल्याने संधीचे सोने करत ३ चौकार आणि ४ षटकार मारले होते. त्या ओव्हरमध्ये नो बॉलची एक धाव धरून एकूण ३७ धावा झाल्या होत्या. आयपीएलमधील सर्वाधिक धावा देणारी ओव्हर म्हणून त्या ओव्हरला ओळखले जाते. 

२. सुरेश रैना

दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सुरेश रैनाला देखील नो बॉलमुळे फायदा झाला होता. २०१४ च्या आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबविरूद्ध खेळताना त्याने परविंदर अवानाच्या बॉलिंगवर ३२ धावा गोळा केल्या होत्या. यात त्याने २ षटकार आणि ५ चौकार मारले होते.

३. विराट कोहली

एखाद्या विक्रमाचा विषय सुरू असेल आणि किंग कोहली मागे असेल असे होणे कठीण आहे. एका ओव्हरमध्ये ३० धावा करत कोहलीने या यादीत तिसरा क्रमांक पटकावला आहे. २०१६ आयपीएलमध्ये त्याने गुजरात लायन्सविरुद्ध शिवील कौशिकच्या बॉलिंगवर धमाकेदार बॅटिंग केली होती.  त्याने ४ षटकार, २ चौकार आणि एका बॉलवर २ धावा घेत ३० धावा पूर्ण केल्या होत्या.

४. ख्रिस गेल

चौथा क्रमांक पण ख्रिस गेलने पटकावत एकाच ओव्हरमध्ये ३० धावा केल्या होत्या. २०१२ साली पुणे वॉरीयर्सचा बॉलर राहुल शर्माच्या बॉलिंगवर पठ्ठ्याने एका मागे एक ५ षटकार ठोकले. एका बॉलमुळे त्याचे ६ बॉल्समध्ये ६ षटकार हुकले होते. तरी त्याने ३० धावा मात्र पूर्ण केल्या होत्या.

५. वीरेंद्र सेहवाग

सेहवागने पहिल्याच आयपीएलमध्ये आपला दम दाखवत बॅटिंगचा करिष्मा दाखवला होता. त्याने डेक्कन चार्जर्सविरुद्ध खेळताना ३० धावा केल्या होत्या. 

 

याच यादीत राहुल तेवतीया - ३० धावा, शॉन मार्स - ३० धावा, निकोलस पुरन- २८ धावा, हार्दिक पांड्या- २८ धावा एलबी मोर्केल - २८ धावा यांचा देखील समावेश आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required