मुरलीधरनने घरातच दुसरा मुरलीधरन तयार केलाय? मुरलीधरन मुलाची बॉलिंग स्टाईल पाहून घ्या!!

मुथिया मुरलीधरन हा श्रीलंकन बॉलर प्रत्येक क्रिकेटप्रेमीने प्रेम करावा असा आहे. आजवरच्या क्रिकेट इतिहासातील सर्वोकृष्ठ बॉलर कोण याची यादी काढली तर त्यात मुरलीधरन टॉपवर असेल. कसोटी क्रिकेटमध्ये ८०० पेक्षा जास्त विकेट्स घेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो पहिल्या स्थानी आहे.

मुरलीधरन बॉलिंग करायचा तेव्हा जगभरातील दिग्गज खेळाडूंना संघर्ष करावा लागत असे. सचिन तेंडुलकर, ऍडम गिलख्रिस्ट असे इतर बॉलर्सची धुलाई करणारे बॅट्समन मात्र मुरलीधरन समोर दबावात खेळत असत, इतकी त्याच्या बॉलिंगची दहशत होती. कसोटीप्रमाणेच वनडेमध्ये सुद्धा आपली चमक दाखवत त्याने वनडेमध्ये ५३४ आणि टी ट्वेन्टीत १३ विकेट्स घेतले आहेत. कसोटीत तर त्याने अवघ्या १३३ सामन्यांमध्ये २२.७ च्या सरासरीने विकेट्स घेतल्या आहेत.

आज बोभाटाला मुरलीधरनची आठवण झाली, कारण श्रीलंकन संघाला आता दुसरा मुरलीधरन मिळाला आहे. हा दुसरा मुरलीधरन दुसरा तिसरा कोणी नाही तर खुद्द त्याचाच मुलगा नरेन आहे. मुरलीधरनने आपल्या मुलाचा बॉलिंग करतानाचा व्हिडीओ ट्विट केला आहे. 

हा व्हिडीओ बघितल्यावर प्रत्येकाला त्याच्यात मुरलीधरन दिसत आहे. तुम्ही जर हा व्हिडीओ बघितला तर नरेनची स्टाईल बघून तुम्हाला मुरलीधरनची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. अगदी 'सेम टू सेम' आपल्या वडिलांसारखीच तो बॉलिंग करताना दिसतो. आता भविष्यात मुरलीधरनचा हा मुलगा आपल्या वडिलांप्रमाणे विक्रम करतो का ते पाहण्यासारखे असेल.

 

सबस्क्राईब करा

* indicates required