computer

पीव्ही सिंधूने ऑलिम्पिकनंतर पुनरागमनाच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

कालचा दिवस आणि आजचा दिवस या दोन दिवसांचे वर्णन करायचे झाल्यास देशवासियांना कभी खुशी कभी गम असेच वाटत असेल. कारण दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू डेन्मार्क ओपनमध्ये काल उपांत्य फेरीत गेली होती, तर आज मात्र तिचा पराभव होऊन ती स्पर्धेबाहेर गेली आहे.

सिंधूचा दक्षिण कोरियाच्या आन सियांग हिने महिला एकेरीत पराभव केला. अवघ्या काही महिन्यांपूर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारी २६ वर्षांची सिंधू या लढतीत मात्र अर्ध्या तासाच्या खेळात २१-११, १२-२१ अशा फरकाने पराभूत झाली.

सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सलग दुसऱ्यांदा पदक जिंकल्यावर तिने छोटासा ब्रेक घेतला होता. आता ब्रेक घेऊन डेन्मार्क ओपनमध्ये उतरल्यावर देशवासीयांच्या नजरा सिंधूकडे खिळल्या होत्या. तिच्या कोरियन प्रतिस्पर्धीने तिला तिचा नैसर्गिक खेळ बहरु देण्यास संधी मिळू दिली नाही.

सिंधूचा आधीचा खेळ बघता सिंधू या स्पर्धेत देखील पदक घेऊन भारतात येईल असे वाटणे साहजिक होते. काल दिवसभर सिंधूच्या उपांत्यफेरीत पोहोचल्याने जागी झालेली आशा आज मावळली आहे. असे असले तरी सिंधूचा खेळ पुढील स्पर्धांमध्ये बहरून ती भारतासाठी पदके खेचून आणेल अशी आशा व्यक्त करण्यास हरकत नाही.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required