computer

राहुल द्रविड भारतीय क्रिकेटसंघाचा प्रशिक्षक होतोय, यामुळे संघाची कामगिरी सुधारेल?

भारतीय संघाची कामगिरी सध्या चांगलीच सुमार सुरू आहे. T20 वर्ल्डकपमधील पहिले दोन्ही सामने दारुण हरावे लागले आहेत. अशा परिस्थितीत रवी शास्त्रींची गच्छंती होऊन नवा दमाचा प्रशिक्षण येणे गरजेचे आहे असे म्हटले जात होते.

रवी शास्त्रीचा कार्यकाळ या वर्ल्डकपनंतर संपणार आहे. आता अधिकृतपणे राहुल द्रविड भारताचा प्रशिक्षक असेल अशी घोषणा बीसीसीआयकडून करण्यात आली आहे. द्रविडच्या नावाची घोषणा झाल्यावर क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

द्रविड येत्या १७ नोव्हेंबरपासून न्यूझीलँडबरोबर सुरू होणाऱ्या २ कसोटी आणि ३ T20 सामन्यांपासून तो ही धुरा सांभाळणार आहे. द्रविडबद्दल वेगळे सांगण्याची गरज नाही. २०१८ साली त्याच्याच प्रशिक्षणाखाली अंडर १९ संघाने वर्ल्डकप जिंकला होता. तर २०१६ साली संघ फायनलमध्ये गेला होता.

२०१९ पर्यन्त तो भारत अ संघाचा प्रशिक्षक होता. यावेळी संघाने मोठी प्रगती नोंदवली होती. याच संघांमधील काही खेळाडू आता भारतीय संघात खेळत असल्याने त्यांच्या सोबत असलेल्या द्रविडच्या ट्युनिंगचा संघाला फायदा होऊ शकतो.

राहुल द्रविड याआधी नॅशनल क्रिकेट असोसिएशनचा संचालक राहिलेला असल्याने त्याला पोरांमधील क्वालिटी हेरून त्यांना चांगले प्रशिक्षण देण्याची कला अवगत आहे. अतिशय शांत पध्दतीने तो संघाला हाताळत असतो. यावर्षीच्या सुरुवातीला श्रीलंका दौऱ्यावर शिखर धवनच्या नेतृत्वाखाली गेला असताना त्याने यशस्वी प्रशिक्षक पदाची जबाबदारी हाताळली होती.

२०१३ साली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. तेव्हापासून आजवर भारताने एकदाही आयसीसीची कुठली ट्रॉफी जिंकलेली नाही. ट्रॉफीचा हा दुष्काळ संपवण्याची जबाबदारी द्रविडवर असणार आहे. द्रविडला या कामासाठी १० कोटींचे वार्षिक मानधन मिळणार आहे.

बीसीसीआयचा अध्यक्ष आणि द्रविडचा माजी सहकारी सौरभ गांगुलीने द्रविडचे अभिनंदन केले आहे. तसेच स्वतः द्रविडने आपण या निवडीने भारावून गेले असल्याचे सांगितले आहे. भारतीय क्रिकेटची सुरू असलेली वाताहत आता थांबेल अशी अपेक्षा आपण आता करू शकतो.

राहुल द्रविड- द वॉलला नव्या जबाबदारीसाठी बोभाटाकडून शुभेच्छा...

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required