आता राहुल द्रविडचा मुलगाही क्रिकेटच्या मैदानात
भारतीय क्रिकेट टीमच्या बॅटिंगची धुरा अनेकवर्ष समर्थपणे आपल्याखांद्यावर वाहणाऱ्या Mr. Dependable राहुल द्रविडचा सुपुत्र समित आता क्रिकेटच्या मैदानात उतरला आहे. टायगर कप या 14 वर्षांखालील मुलांसाठी असलेल्या क्रिकेट स्पर्धेत त्याने 125 धावांची जबरदस्त खेळी करून BUCC (A) या आपल्या संघास 246 धावांनी विजय मिळवून दिलाय.
उजव्या हाताने बॅटींग करणाऱ्या समितने 22 चौकार आणि एक षटकार मारून आपले शतक पूर्ण केले. या आकड्यावरून तो राहुलप्रमाणेच चौकारांवर अधिक भर देतो असे दिसते.
याआधी नोव्हेंबर 2015 मध्ये द्रविडने एका मुलाखतीत माझी मुलं समित आणि अन्वय खेळताना साऊथ आफ्रिकेचा स्टार बॅट्समन ए बी डिव्हिलियर्सचे शॉट्स खेळायचा प्रयत्न करतात असे सांगितले होते.
अर्जुन तेंडुलकर, समित द्रविड असे क्रिकेटपटूपुत्र आपले नशीब आजमावताना त्यांची गत रोहन गावसकर सारखी होऊ नये हीच अपेक्षा आपण करू शकतो, हो ना?




