रिषभ पंत अन् उर्वशी रौतेला यांच्यात सोशल मीडियावर रंगले युद्ध!! वाचा काय आहे नेमकं प्रकरण...

बॉलिवूड आणि क्रिकेटचं खूप जुनं नातं आहे. अनेकदा क्रिकेटपटू आणि बॉलिवूड यांच्यात प्रेमसंबंध असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. आता नुकताच भारतीय यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. उर्वशी रौतेलाने सोशल मीडियावर रिषभ पंत बाबत वक्तव्य केले होते. त्यावर रिषभ पंतने देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काय आहे नेमकं प्रकरण? चला पाहूया.

रिषभ पंत आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हे दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. मात्र त्यानंतर रिषभ पंतने तिला व्हॉट्सॲपवरून ब्लॉक केलं होतं.अशी पोस्ट काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती. आता उर्वशी रौतेलाने रिषभ पंत बाबत मोठे वक्तव्य केले आहे. मात्र तिने रिषभ पंतचा उल्लेख आरपी असा केला आहे.

काय म्हणाली उर्वशी?

बॉलिवूड हंगामाला दिलेल्या एका मुलाखतीत उर्वशी रौतेलाने रिषभ पंतला आरपी संबोधित करत म्हटले होते की, "जेव्हा मी शूटिंगसाठी बनारसवरून दिल्ली आले होते. त्यावेळी आरपी मला हॉटेलमध्ये भेटायला आला होता. मात्र व्यस्त कार्यक्रमामुळे माझी आणि त्याची भेट होऊ शकली नव्हती. त्यामुळे तो वाट पाहत होता. यादरम्यान त्याने मला १७ कॉल केले होते. हे पाहून मला खूप वाईट वाटलं. त्यानंतर आम्ही मुंबईमध्ये भेटायचं ठरवलं आणि भेटलो देखील होतो."

उर्वशी रौतेलाचा हा व्हिडिओ व्हायरल होताच,रिषभ पंतने देखील पोस्ट शेअर करत तिला जोरदार प्रत्युत्तर दिले. मात्र त्याने काही मिनिटात ही पोस्ट डिलीट केली. त्याने लिहिले होते की, "काही लोकं लोकप्रियतेसाठी मुलाखती देतात आणि त्यात खोटे बोलतात हे किती हास्यास्पद आहे. नाव आणि प्रसिद्धीसाठी लोकं खोटे बोलतात हे पाहून वाईट वाटते. मी अशा लोकांना शुभेच्छा देतो."

रिषभ पंतने तिला प्रत्युत्तर देत बहीण असे म्हणून संबोधित केले आहे. यासाठी त्याने पिछा छोडो बेहेन असा हॅशटॅग वापरला आहे. रिषभ पंतने केलेल्या पोस्टनंतर उर्वशी रौतेलाने देखील जोरदार प्रत्युत्तर देणारी पोस्ट शेअर केली आहे. "छोटू भैय्याने बेट बॉल खेळावा. मी काही मुन्नी नाही की तुझ्यासाठी बदनाम व्हावे. तिने #रक्षाबंधन मुबारक असा हॅशटॅग देखील वापरला आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required