शेन वॉर्नच्या निधनानंतर हिटमॅनने वाहिली भावनिक श्रद्धांजली, म्हणाला..."

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याचे शुक्रवारी (४ मार्च) हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या ५२ व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या जाण्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्याच्या निधनानंतर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी हळहळ व्यक्त केली आहे. दरम्यान भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने देखील श्रद्धांजली वाहिली आहे.

सध्या भारत विरुध्द श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा (५ मार्च ) खेळ सुरू होण्यापूर्वी रोहित शर्माने शेन वॉर्न बद्दल मोठे वक्तव्य केले आहे. शेन वॉर्न बद्दल बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, " हे क्रिकेट जगताचे मोठे नुकसान आहे. शेन वॉर्नच्या निधनाची बातमी ऐकून मला खूप दु:ख झाले आहे. जागतिक क्रिकेटमध्ये वॉर्नचे किती योगदान आहे हे आपल्याला चांगलेच माहीत आहे. त्यांनी संपूर्ण पिढीला प्रेरणा दिली आहे. यासह ते अप्रतिम गोलंदाजही होते. त्याच्या कुटुंबासाठी माझ्या संवेदना."

शेन वॉर्नने आपल्या कारकीर्दीत एकूण १४५ कसोटी सामने खेळले. या सामन्यांमध्ये त्याने ७०८ गडी बाद केले होते. यासह वनडे क्रिकेटमध्ये त्याने २९३ गडी बाद केले होते. तसेच टी२० क्रिकेटमध्ये देखील त्याचा दबदबा पाहायला मिळाला होता. त्याने आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाचे नेतृत्व केले होते. या संघाचे नेतृत्व करताना त्याने २००८ मध्ये राजस्थान रॉयल्स संघाला आयपीएल स्पर्धेचे जेतेपद मिळवून दिले होते.

सबस्क्राईब करा

* indicates required