computer

या पोराची बॉलींग बघून सचिन तेंडुलकर खुश झाला !

चिन तेंडुलकर जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी तो आजही क्रिकेट जगत असतो. वेळोवेळी भारतीय संघाला आणि त्याचा आयपीएल संघ -मुंबई इंडियन्स-यांना मार्गदर्शन करत असतो.वेळोवेळी त्याच्या स्वतःच्या बॅटिंगचे व्हिडिओ पण तो पोस्ट करतो.

नुकताच सचिनने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर बंगालमधील एका लहान मुलाचा व्हिडिओ शेयर केला आहे.या मुलाची बॉलिंग क्रिकेटमधील सर्वश्रेष्ठ खेळाडू सचिनला पण आवडली आहे.या लहान मुलाची वय अवघं ८-१० असेल पण त्याची बॉलिंग बघितल्यावर या पठ्ठ्या पूढे जाऊन नाव करेल असेच कुणालाही वाटेल.

या व्हिडिओत आपल्या भन्नाट बॉलिंग स्टाईलने आपल्या सहकाऱ्यांच्या एकापाठोपाठ दांड्या उडवताना दिसतो. त्याच्यासमोर बॅटिंग करणारे मुलं सावरण्याच्या आत त्यांना त्यांची दांडी उडालेली या व्हिडिओत दिसते.सचिन तर त्याची बॉलिंग पाहून फारच भारावून गेला आणि हा व्हिडीओ त्याने शेअर केला !

सचिनप्रमाणेच अफगाणिस्तानचा लेगस्पिनर राशिद खान देखील या पोस्टवर कमेंट करून या मुलाचे कौतुक करत होता.हा मुलाचा व्हिडिओ स्वतः सचिनने शेयर केल्यावर त्याच्या आजूबाजूच्या लोकांना नक्कीच त्याचा अभिमान वाटला असेल.
काहीजणांच्या मते हा तर उगवता 'शेन वॉर्न' आहे

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required